Home / यवतमाळ-जिल्हा / वणी शहरात श्रीकृष्ण...

यवतमाळ-जिल्हा

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
ads images
ads images
ads images

भजन संध्या,नाटक, कवी संमेलन, स्पर्धा, शोभायात्रा.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यकमांसह विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपू्र्ण सोहळा श्री विनायक मंगल कार्यालय गणेशपूर रोड व अमृत भवन येथे होणार आहे. तर या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले लखबिरसिंह लक्खा यांची भजन संध्या शासकीय मैदान येथे २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. श्री कृष्ण जन्माष्टमी समिती वणी द्वारा हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण आठवडाभर चालणा-या विविध कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.

Advertisement

मंगळवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी 'जय बोला प्रिय पत्नीची' या धमाल विनोदी कौटुंबीक नाटकाने या सोहळ्याची सुरुवात होत आहे. श्री विनायक मंगल कार्यालय येथे संध्या 7 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. बुधवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी संध्या 6.30 वा. पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदान येथे संपूर्ण देशातच नाही तर जगभरात आपल्या जगरात्यासाठी प्रसिद्ध असलेले 'किजो केसरी के लाल' फेम गायक लखबीर सिंह लक्खा यांची भजन संध्या होणार आहे.

शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्या. 6 वा. श्री विनायक मंगल कार्यालय येथे सुप्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन प्रा. महेंद्र गणपुले यांचा हास्य नगरी हा धमाल एकपात्री नाट्य प्रयोग होणार आहे. शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी संध्या 6 वा. श्री विनायक मंगल कार्यालय येथे अंकी कौटुंबीक नाटक 'संध्याछाया' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तर रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी सं. 6 वा. अमृत भवन येथे राज्यातील नामवंत कविंचे कवि संमेलन होणार आहे.

 

*शनिवारी व रविवारी विविध स्पर्धा*

शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट अमृत भवन येथे दु. 2 वा. बाल कृष्ण दर्शन (कृष्ण व महाभारतातील पात्र) ही वेशभूषा स्पर्धा, दु. 3 वाजता डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कृष्ण झुला, कृष्ण मटकी सजावट हा विषय आहे. दु. 4 वा. 1 मिनिट स्पर्धा व हौजी स्पर्धा होणार आहे. तर रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दु. 2 वा. धार्मिक व देशभक्तीवर आधारीत सोलो व गृप डान्स स्पर्धा होणार आहे. तर दु. 3 वा. 1 मिनिट स्पर्धा व हौजी स्पर्धे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा वर्ष 1 ते 6, वर्ष 7 ते 11 व वर्ष 12 ते 18 अशा तीन वयोगटात होणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी राजू रिंगोले, ख्याती चोरडिया,  विद्या मुथा यांना संपर्क साधता येणार आहे.

 

सोमवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. स. 6 वा. श्रीकृष्ण पालखी यात्रा निघणार आहे. ही पालखी चोरडिया निवास ते श्रीकृष्ण मंदीर असा प्रवास करणार आहे. संध्या. 6 वा. अमृत भवन येथे सुंदरकाड पाठ व जाप होणार आहे. यात श्रीकृष्ण लीलांचे नाट्य रुपांतरण सादर केले जाणार आहे. रात्री 10 वा. अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे. या जन्मोत्सवात अभिषेक व श्रीकृष्ण श्रुंगार, बालगोपाल दर्शन, मटकी फोड इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

 

*भव्य शोभायात्रेने जन्मोत्सवाची सांगता*

मंगळवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी स. 11 वा. अमृत भवन येथे गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दु. 4 वा. अमृत भवन येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या यात्रेत विविध देखावे व वाद्य वृंद पथक प्रमुख आकर्षण राहणार आहे. या सर्व कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन ऍड कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन्माष्टी समितीचे सचिव उमेश पोद्दार, कार्याध्यक्ष रितेश फेरवाणी, उपाध्यक्ष अनिल रेभे, विशाल दुधबळे, सहसचिव सुरेश मांडवकर, कोषाध्यक्ष- सचिन क्षिरसागर, सहकोषाध्यक्ष - शुभम मदान, प्रसिद्धी प्रमुख - निखिल मार्कडे, सहप्रसिद्धी प्रमुख - हर्ष भारवाणी, सहकार्याध्यक्ष राजु रिंगोले, सहसंयोजक मयुर गोयंका परिश्रम घेत आहे. विजय चोरडिया, विजय पुण्यानी, राजेश बत्रा, संतोष मार्कंडे, आशिष गुप्ता, नारायण गोडे, दिवान फेरवानी, राजाभाऊ बिलोरिया, अरुण कावडकर, गजानन बत्तुलवार यांच्या मार्गदर्शनात जन्मोत्सावाचे नियोजन पूर्ण केले जात आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...