Home / यवतमाळ-जिल्हा / कलावती बांदुरकर यांनी...

यवतमाळ-जिल्हा

कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.

कलावती बांदुरकर यांनी दाखविली  शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.
ads images
ads images

यात्रेचे मुख्य आयोजक वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खूलसंगे.

वणी प्रतिनिधी  - खासदार प्रतिभाताई धानोरकर, व माजी आमदार वामनराव कासावार  यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक, व बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने वणी  विधानसभा क्षेत्रात शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथील आराध्य दैवत जानामाय कासामाय देवस्थान येथून करण्यात आला राज्य सरकारने व स्थानिक आमदाराने चुकीची माहिती  देऊन मतदारांची दिशाभूल केली त्याची पोलखोल करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वसंत जिनिंग अँड प्रेसिंग चे अध्यक्ष तथा झरी तालुका  काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या संकल्पनेतून  ही न्याययात्रा काढण्यात आली आहे .शेतकरी न्याय यात्रेचे उद्घाटन  कलावती बांदुरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांचे हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा,शेती साहित्यावरील जीएसटी रद्द करावा,60 वर्षावरील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी ,जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,वणी  विधानसभा क्षेत्रातील पिक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा ,कोळसा खाणी  व सिमेंट कंपनीमध्ये स्थानिकांना 80 टक्के रोजगार द्यावा झरी, मारेगाव येथे बस स्थानक बांधण्यात यावे, वणी  विधानसभा क्षेत्रात मिळणाऱ्या 65 टक्के खनिज विकास निधी या भागातच खर्च करावा, वणी  विधानसभा क्षेत्रात कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची वर्षभरातच दुरावस्था झाली आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी करून कमिशन खोरांवर कठोर कारवाई करावी वणी  येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम त्वरित सुरू करावे ,यासह इतर मागण्यांना घेऊन ही यात्रा काढण्यात आली आहे. शेतकरी न्याय यात्रा मारेगाव तालुक्यातील वनोजा,हिवरा,कानडा',पारडी, मार्डी,यासह अनेक गावात  न्यायात्रेचे पुष्प गुच्छ देऊन व औक्षवंत करून स्वागत करण्यात आले. यात्रेचे प्रत्येक गावात ढोल ताशाचा गजरात स्वागत करण्यात आले अनेकांनी आपल्या गावची समस्यांची निवेदने मुख्य आयोजक आशिष खुलसंगे यांच्याकडे सोपवली यात्रेत वणी,  मारेगाव, झरी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र पाटील ठाकरे,अरुणाताई खंडाळकर, गौरीशंकर खुराना, अँड  देविदास काळे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे  , राजू येलटीवार,ओम ठाकूर,  डॉ. मोरेश्वर पावडे, मारोती  गौरकार, राजू कासावार, घनश्याम पावडे, अशोक पांडे, राहुल दांडेकर, अंकुश माफूर, रवी धानोरकर, गजानन खापणे, प्रकाश मॅकलवार, निलेश येलटीवार, यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित झाले आहे

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.

वणी/ प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युवकांचा मोठ्या संख्येने...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशन पंजाब येथील अमृतसर येथे संपन्न

यवतमाळ : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब येथील अमृतसर येथे ७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. दिवसभर...