Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / जि. प. शाळा मुकुटबन चे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

जि. प. शाळा मुकुटबन चे मुख्याध्यापक श्री शेकन्ना भिंगेवार सर यांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न

जि. प. शाळा मुकुटबन चे मुख्याध्यापक श्री शेकन्ना  भिंगेवार सर यांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न
ads images

मुख्याध्यापक भिंगेवार हे कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ, प्रेमळ, हुशार, विद्यार्थी प्रिय म्हणून ख्याती प्राप्त

झरी जामणी : तालुक्यातील मुकूटबन येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत मुख्याध्यापक शेकन्ना देवन्ना भिंगेवार यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मुख्याध्यापक भिंगेवार हे कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ, प्रेमळ, हुशार, विद्यार्थी प्रिय होते. सेवा निवृत्त मुख्याध्यापक भिंगेवार यांचा जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा मुकूटबन तर्फे सेवानिवृत्त निरोप व सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले.

मुख्याध्यापक शेकन्ना भिंगेवार यांची शिक्षक म्हणून २२ डिसेंबर १९८८ ला नियुक्ती झाली. वयाच्या ५८ व्या वर्षी ४ महिने शिल्लक असताना त्यांनी स्वेच्छा निवृत्ती १ ऑगस्ट २०२४ ला घेतली. सेवा निवृत्त मुख्याध्यापक भिंगेवार यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा मुकूटबन येथील शिक्षकांच्या वतीने निरोप व सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती मुकूटबनचे अध्यक्ष राजुभाऊ तूनकीवार यांच्या अध्यक्षतेखाली निरोप व सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात मान्यवरानी त्यांनी केलेल्या शाळेबद्दल कामाचा यथोचित उल्लेख करून कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी शाळेचे नवीन मुख्याध्यापक माधव उदार यांनी प्रास्ताविक केले. शाळेच्या सर्व शिक्षक वृंदानी भिंगेवार यांच्या कार्याविषयी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सुध्दा भिंगेवार यांच्या कार्याविषयी कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक बळीराम तुडमवार यांनी केले. यावेळी अध्यक्ष राजुभाऊ तूनकीवार, नवीन मुख्याध्यापक माधव उदार, शिक्षक बळीराम तुडमवार, गजानन बरशेट्टीवार, दीपक दोडके, माया जिद्देवार, सुनीता कुळमेथे, करुणा पांतगवार या सर्वांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेकन्ना भिंगेवार यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पँट शर्टचे कापड देऊन त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.

ताज्या बातम्या

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* 26 December, 2024

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध*    *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* 26 December, 2024

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न. 26 December, 2024

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न.

वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र 25 December, 2024

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...