दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
Reg No. MH-36-0010493
झरी जामणी : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर कांग्रेस पक्षाकडून वणी विधानसभा क्षेत्रात 9 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यत शेतकरी न्याय यात्रचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती झरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
झरी तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष तसेच वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांचे नेतृत्वात वणी विधानसभा क्षेत्रामध्ये वणी, मारेगाव व झरी जामणी तालुक्यात शेतकरी न्याय यात्रा निघणार आहे. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवकांनी या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने आपल्या हितासाठी व न्यायासाठी या यात्रेत सहभागी व्हा असे आवाहन मुकूटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आशिष खुलसंगे यांनी केले आहे. शेतकरी न्याय यात्रेची सुरुवात मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी पासून, त्यानंतर झरी जामणी तालुक्यातील झमकोला येथील शिव मंदिर येथून सुरुवात, तर २२ ऑगस्टला शेतकरी न्याय यात्रेचे समापन वसंत जिनिंग वणी येथे होणार आहे.स्वामीनाथन आयोग लागू करून शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची सरसकट १००% कर्जमाफी करावी, कृषी उपयोगी सामग्री वर लादलेली जीएसटी रद्द करावी, ६० वर्षा वरील शेतकऱ्यांना प्रती महिना १० हजार रुपये देण्यात यावे, जनगणना जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, कापसाला १२ हजार रु. प्रती क्विंटल, तुरीला १५ हजार रु. प्रती क्विंटल तर सोयाबीनला ८ हजार रु. प्रती क्विंटल भाव देण्यात यावा. वणी विधानसभा क्षेत्रातील पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकयांना न्याय मिळावा, दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळमदत जाहीर करावी, कृषी पंपाचे विज बिल संपूर्णतः माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना २४ तास विज पुरवठा पुरवण्यात यावा, वणी विधानसभा क्षेत्रामध्ये, वन्य प्राण्यामुळे शेतीचे होणारे नुकसान बधता शेतकन्याना काटेरी तार कंपाउंड १००% सब्सिडीमध्ये देण्यात यावे. झरी मारेगाव व वणी तालुक्यात ओबीसी मुला-मुलीसाठी शासकीय वसतिगृह सुरु करावे. वणी विधानसभा क्षेत्रामधी सर्व कंपनीमध्ये नोकरीसाठी ८०% स्थानिक युवक युवतीना प्राध्यान मिळावे. मुकूटबन, झरी जामणी व मारेगाव येथे तात्काळ बस स्थानक सुरु करावे व झरी व मारेगांव तालुक्यात क्रीडा संकुलाचे काम त्वरित सुरु करावे. मारेगाव येथील एमआयडीसी चा प्रश्न तातडीने सोडवावा. वणी विधानसभा क्षेत्रात मिळणारा खनिज विकास निधी पूर्ण जिल्हाकरिता न वापरता, केवळ वणी विधानसभा क्षेत्राकरिता वापरण्यात यावा,शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेत पांदण रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी पत्रकार परिषदेमध्ये आशिष भाऊ खूलसंगे यांनी माहिती दिली. पत्रकार परिषदेला झरी जामणी तालुका काँग्रेस कमिटी व वसंत जिनिंग अध्यक्ष आशिष खुलसंगे, कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजीव कासावार, झरी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुरेंद्र गेडाम, वसंत जीनिंग संचालक विनोद गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजूभाऊ यल्टीवार, ओम ठाकूर, विलास चिटलवार, सुनील ढाले,भुमारेड्डी येनपोतूलवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...
*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...