Home / यवतमाळ-जिल्हा / वरोरा टप्प्यावरुन वणीचे...

यवतमाळ-जिल्हा

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.
ads images
ads images

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर येथे जाणारी बस वरोरा बस स्थानकावर न जाता सरळ चंद्रपुरच्या दिशेने निघून जाते. त्यामुळे चंद्रपुर बसमध्ये आलेले वणीचे प्रवासी नागपुर रोडवरील वरोरा टप्प्यावर उतरतात. मात्र नागपुर व चंद्रपुर वरुन वणीला जाणा-या महामंडळाच्या बसेस वरोरा टप्प्यावरुन वणीच्या प्रवाशांना बसमध्ये बसण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे सदर ठिकाणाहुन वणीला जाणा-या प्रवाशांना आटोद्वारे अव्वाच्या सव्वा पैसे मोजून नाईलाजाने बस स्थानकावर यावे लागते किंवा एखाद्या खाजगी बसने जादाचे पैसे देऊन वणीला यावे लागते. वेळप्रसंगी काही प्रवाशांना रेल्वे क्रासिंग ओलांडून पायदळ वरोरा बस स्थानक गाठावे लागते. याक्षणी जीव धोक्यात घालून जावे लागते. काही वर्षांपूर्वी अशीच एक जिवघेणी घटना घडून वरोरा बस स्थानक गाठतांना वणी येथील नागरीकाला रेल्वेने कटून जिव गमवावा लागला होता. वरोरा टप्प्यावरुन बस स्थानक जवळपास अंदाजे ४ ते ५ कि.मी. अंतरावर असल्यामुळे प्रवाशांना बस स्थानक गाठण्यात चांगलीच कसरत करावी लागत आहे.

       त्यामुळे नागपुर व चंद्रपुरहून वणीकडे येणा-या जाणा-या प्रवाशांना वरोरा टप्प्यावरुन किंवा टप्प्यापर्यंत महामंडळाच्या बसमध्ये बसण्याची परवानगी देण्यांत यावी. याकरीता वरोरा टप्प्याला जूने बस स्थानक घोषीत करावे व तेथून किंवा तेथपर्यंत आवश्यक ते तिकिट आकारावे. जूने बस स्थानक घोषीत करण्यास अडचण येत असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करुन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी प्रशांत गाडगे, दिपक गोहणे, प्रविण उपरे, मंगल तेलंग, शशिकांत नक्षीणे, अविनाश नक्षीणे, बंडू गणवीर, आकाश बोरकर, गौरव जवादे, संदीप दुपारे यांचेसह वणीतील अनेक नागरीकांनी विभागीय नियंत्रक, नागपुर, चंद्रपुर व यवतमाळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...