Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / बापरे! रेशनच्या दुकानात...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

बापरे! रेशनच्या दुकानात आढळला चक्क प्लास्टिकचा तांदूळ

बापरे! रेशनच्या दुकानात आढळला चक्क प्लास्टिकचा तांदूळ
ads images

झरी जामनी तालुक्यातील मांगली येथे धक्कादायक प्रकार उघडकीस

झरी: तालुक्यातील मांगली येथील रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळून आल्याने निष्पन्न झाले. मांगली येथील रहिवासी मंगेश चामाटे यांना आज सरकारी रेशन दुकानातून तांदूळ वितरित करण्यात आला,हा तांदूळ साफ करण्यासाठी मंगेश चामाटे यांच्या पत्नी यांनी तांदूळ साफ करताना त्यांना तांदळामध्ये प्लस्टिकचा तांदूळ असल्याचे दिसून आले त्यांनी नंतर ही गोष्ट त्यांचे पती मंगेश चामाटे यांना सांगितली असता मंगेश चामाटे यांनी स्वतः तांदूळ चावून बघितला असता तांदूळ प्लास्टिकचा असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

या प्लास्टिक मिश्रित तांदळाची चौकशी पूर्ण होईपर्यंत वितरण थांबविण्याची मागणी केली आहे. पिवळ्या व केशरीमधील प्राधान्य गटाला रेशन दुकानातून गहू व तांदूळ वितरण केले जात आहे. अनेकवेळा या वितरणाबाबत तसेच खराब धान्य पुरवठा केल्याबद्दल तक्रारी होतात. परंतु तालुक्यातील मांगली येथे असलेल्या रेशन दुकानातून लाभार्थ्याना मिळालेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व रबरमिश्रीत तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

अन्न प्रशासन विभागाने या घटनेची तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा जनता आंदोलन छेडणार असल्याचा गर्भित इशारा यावेळी भारतीय वार्ता न्यूज ने दिला आहे.

सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ

तहसीलदार ,पुरवठा अधिकारी यांच्याकडे जाऊन तक्रार करणार आहोत. या गंभीर प्रकरणा बद्दल माहिती देऊन चौकशीच्या मागणीबाबत पुरवठा अधिकाऱ्याना धारेवर धरले जाणार आहे. हा गंभीर प्रकार असून, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होत आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी माझ्या वतीने करण्यात येणार आहे.
- मंगेश चामाटे (रहिवासी मांगली)

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता...

झरी तालुक्यात पीकविमा कंपनी प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांची लूट

झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप...

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन...