Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *सामाजिक कार्यकर्ते...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया उतरणार विधानसभेच्या मैदानात* *पक्षानी आतातरी माझा विचार करावा. विजय चोरडिया*

*सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया उतरणार विधानसभेच्या मैदानात*    *पक्षानी आतातरी माझा विचार करावा. विजय चोरडिया*
ads images
ads images

*सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया उतरणार विधानसभेच्या मैदानात*

 

Advertisement

*पक्षानी आतातरी माझा विचार करावा. विजय चोरडिया*

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी : -सामाजिक कार्यकर्ते व दातृत्वाचे धनी म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या २० वर्षांपासून राजकारण, समाजकारणात असून पक्षाने विश्वास टाकला तर निवडणुकीत उभे राहणार, अशी माहिती त्यांनी २० जुलै रोजी विनायक मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.वणी विधानसभा क्षेत्रात माझे अविरत सामाजिक कार्य सुरु आहे. या माध्यमातून तिन्ही तालुका क्षेत्रात दांडगा जनसंपर्क स्थापित झाला आहे. सर्व क्षेत्रातील उपक्रम व सर्व स्तरातील उपक्रम राबवत असल्याने आज सर्व जातीधर्म आणि सर्वच स्तरातील लोकांशी वैयक्तिक संबंध प्रस्तापित झाला आहे. यासह पक्षाचे विविध राजकीय उपक्रम सुरुच असतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे एक नेतृत्व म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.उमेदवारीसाठी दावा राहणार - विजय चोरडिया पक्षात उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी गेल्या ३५ वर्षांपासून समाजकारणात असून गेल्या २० ते २५ वर्षांपासून राजकारणात आहे. माझे निस्वार्थ अविरत सामाजिक व राजकीय कार्य व जनसामान्याची प्रश्ने व अडचणी समजून घेण्याची बाजू असल्यामुळे मी एक उमेदवार म्हणून सक्षम पर्याय भाजपकडे आहे. त्यामुळे पक्ष माझ्याबाबत नक्कीच विचार करेल, अशी मला आशा आहे.विविध क्षेत्रात भरीव कार्य कामगारांच्या आदोलनापासून विजय चोरडिया यांची राजकारणात सुरुवात झाली. त्यानंतर विविध उपक्रम, आंदोलन त्यांच्याद्वारे करण्यात आले आहे. आजपर्यंत अगणित आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांनी केले. हजारो गंभीर रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी त्यांनी घेतली. शेकडो अपंगांना त्यांनी व्हिलचेअर वाटप केले. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात त्यांच्या मदतीने वाचनालय व अभ्यासिका सुरु झाली आहे. पूरग्रस्तांना सर्व मदत त्यांनी केली आहे. खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले. याशिवाय सर्व धार्मिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.पत्रकार परिषदेत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपचे कार्यकर्ते, विजय चोरडिया यांचे समर्थक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...