Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शहरात नळद्वारे येणारे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शहरात नळद्वारे येणारे पाणी हे मलमूत्राचे, मलमूत्र पाणी प्रश्न संदर्भात मनसेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी मुख्याधिकार्यांची घेतली भेट.

शहरात नळद्वारे येणारे पाणी हे मलमूत्राचे, मलमूत्र पाणी प्रश्न संदर्भात मनसेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी मुख्याधिकार्यांची घेतली भेट.
ads images
ads images

वणी:-  वणी शहरात होत असलेला मलमूत्र युक्त पाणी पुरवठा बंद करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत मनसेचे राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी वणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन शुद्ध पाणी पुरवठा देण्याबाबत मागणी केली आहे.

Advertisement

 

 वणी शहरात ठिकठिकाणी घरोघरी नळांद्वारे येणारे पाणी मलमूत्र युक्त असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी मनसेच्या कार्यालयात राजू उंबरकर यांच्याकडे केल्या होत्या. प्राथमिक गरजांमध्ये पाणी येत नाही का? आणि जर येत असेल तर आपणास कदाचित याचा विसर पडलेला दिसून येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.  नदी सभोवतालच्या वार्डातील मलमूत्र, गटार व संडास चे पाणी सरळ नदीत सोडण्यात येत असून ते पाणी फिल्टर प्लांटला येते व फिल्टर प्लांट मृत अवस्थेत असल्याची आपणास कल्पना असताना सुद्धा आपण त्यात केवळ गरजेपेक्षा जास्त क्लोरीन पावडरचा वापर करून पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पाठवले जाते  याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो आणि याची सुद्धा आपणास दक्षता नाही. म्हणूनच आपण एवढे निष्काळजी कसे असू शकतात असा प्रश्न आम्हाला पडलेला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या संपूर्ण प्रकरणांमध्ये आपण जनतेच्या आरोग्याशी खेळत आहात आणि हा अधिकार आपल्याला कोणी दिला असा प्रश्न देखील मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.  वणी शहरातील पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली असून हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. नगरपालिका प्रशासन रोगराईच्या या काळात शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी शहरात दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.      

शहराला पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून १५ कोटी रुपये खर्चून वर्धा नदीच्या रांगणा भुरकी डोहातून मोठा गाजावाजा करत शासना मार्फत जलवाहिनी टाकण्यात आली होती. परंतु ही जलवाहिनी सुध्दा वारंवार निकामी ठरत आहे. त्याचे नियोजन अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. म्हणून ती योजना सुद्धा सपशेल अपयशी ठरली आहे. पाणी आले तरी ते वॉटर फिल्टर प्लांट मध्येच येते व वॉटर प्लांट हा मृत अवस्थेत आहे. हा प्रश्न अतिशय गंभीर असून  सदर प्रश्न नगरपालिका विभागाने येत्या आठ दिवसात निकाली काढावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे या आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान , माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके , शहर  उपाध्यक्ष मयूर गेडाम , मनसे वाहतुक सेनेचे जिल्हा संघटक श्याम सिद्दिकी , रुग्णसेवा केद्र कार्याध्यक्ष अजिद शेख , इरफान सिद्दिकी , लक्की सोमकुवर , शंकर पिंपळकर , संकेत पारखी , मनोज पुराणकर , अयाज खान , रितिक पचारे , कुणाल सोमशेट्टीवार , हिमांशू बोहरा , रुचिर वैद्य , गुड्ड वैद्य , आदित्य अलबलवार,  पियूष पदलमवार , ओम पवार , अनिकेत पांनगंट्टीवार , मंगेश उत्तमवार , श्रीकांत पुल्लेवार,  प्रथम शिल्लेवार दीपक लोणारे,  श्रीकांत बोमीडवार,  रितिक वैद्य इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

शहरात होत असलेल्या पाणीपुरवठ्यात मलमूत्र युक्त पाणी शहराला पाजण्यात येत आहे. त्या संदर्भात आज मुख्याधिकारी यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास आणून दिला.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहीम शहरात राबवणार आहे. या सर्व स्वाक्षरी मोहीम अभियानात वणीकर जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी केले.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...