Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी तालुक्यातील वेकोली...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी तालुक्यातील वेकोली खाणी मुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याकरिता या परिसराचे स्ट्रक्चलर ऑडिट करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी तालुक्यातील वेकोली खाणी मुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याकरिता या परिसराचे स्ट्रक्चलर ऑडिट करा, विजय पिदुरकर यांची मागणी.
ads images
ads images

वणी:- वणी तालुक्यातील पैनगंगा, निर्गुडा, वर्धा, विदर्भ नदी काठा जवळील भाग हा खनिज संपदेने संपन्न असून तालुक्यामध्ये मागील 40 वर्षा पासुन कोळसा खाणी द्वारे कोळसा उत्खनन,डंप, दळणवळण  व नदी काठावर खान सुरक्षेकरिता ओ.बी.चे तटबंधन उभारल्याने कोळसा उद्योग उत्पादन व नफा मिळवून सुरक्षित झाला. परंतु या परिसरात विविध पर्यावरण व संरचनात्मक समस्या कोळसा उद्योगाने निर्माण केल्या आहे. या समस्यांचा सामना करताना येथील रहिवासी शेतकरी, शेतमजूर लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना विविध समस्यांना सामोरे जाऊन अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देऊन स्ट्रक्चलर ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

कोळसा उत्खनन करताना वापरण्यात येणारे अजस्त्रयंत्र सामुग्री,विस्फोट यामधून निर्माण होणारे कंपना मुळे जमीन खचणे त्यामुळे शेतातील लहान पिके खालून कोमेजून जाणे, कोळशा मधील रासायनिक घटकामुळे उत्खनन व वाहतुकी दरम्यान शेत जमिनीवर धुलीकन पडल्यामुळे जमिनीची उत्पादक क्षमता कमी होऊन मातीचे आरोग्य बिघडते. पिकावर धूळ टाकल्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी व अन्य पिके करपून उत्पन्न व प्रतवारी घटते. पिकावर वापरलेले खते व औषधे यावर जास्त खर्च होऊन उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसत आहे. अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे१४ ते २० टन रस्त्यात खड्डे पडून धूळ प्रदूषण व  रस्ता अपघातात जिव जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग हे सर्वच रस्ते ५० टन भार क्षमता निर्माण करण्याची गरज आहे.

नदी काठावर उभारलेले ओ.बी.चे तटबंध व डम्पिंग मुळे छोटे नाले ओढे खान कामामुळे नष्ट झाले. पुराच्या पाण्याचा विसर्ग व निचरा होण्यास विलंब, नदीचा प्रवाह बदलून पूरस्थितीत वेकोलीने मानवनिर्मित संकट उभे केले आहे.

उत्खनन, विस्फोट व दळणवळण यातुन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन नागरिकांना श्वसन, दमा, त्वचारोग, डोळे, चिडचिडेपणा इत्यादी आजारात वाढ झाली आहे.

खाली जवळील रहिवाशांना विस्फोटामुळे होणाऱ्या कंपनात इमारतीला तडे जाणे, खचणे वित्त व जीवित हानीचा धोका वाढला आहे.

खाणीतील क्रियाकालपामुळे नदीमध्ये विविध घटक सरळ जात असल्याने पाणी प्रदूषित होते. यामुळे जलियप्राणी नष्ट होत आहे.

खान उद्योग यामुळे शेतीवर अवलंबून असणारा रोजगार गेला यामध्ये भूमिहीन, शेतमजूर यांच्या उपजिविके करिता उपाय योजना नसल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे.

खान उत्खनन व डम्पमुळे जैवविविधता अनेक स्थानिक उपयोगी वृक्ष नष्ट झाले.

कोळसा खाणींच्या उद्योगामुळे अनेकांना फायदा झाला असला तरी,  यामध्ये स्थानिक रहिवासी शेतकरी, शेतमजूर, या समाजावर जमिनीची उत्पादकता घटल्याने शेती खर्च, आरोग्य, प्रदूषण व इतर खर्चात वाढ होऊन त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. शेतकरी येथील बियाणे लावून उदरनिर्वाहासाठी गुंतवणूक करतो. मात्र धूळ प्रदूषणाने पिके सुकताना पाहून, भावनिक तणाव अनुभवावा लागतो आर्थिक उत्पन्नाचे साधन नष्ट होत असल्याने प्रसंगी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल घेऊन कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ ही बाब अतिशय गंभीर आहे.

या जीवघेण्या समस्याचे गांभीर लक्षात घेऊन वणी परिसराचे जिल्हा कृषी विभाग, पशुधन विभाग, आरोग्य विभाग बैठक नैसर्गिक आपत्ती विभाग, प्रदूषण विभाग, जलसंपदा विभाग, बांधकाम व वेकोली यांची संयुक्त समिती नेमून स्ट्रक्चलर ऑडिट  करून उपाययोजना करावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...