Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अतिक्रमण धारकांची मुजोरी,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अतिक्रमण धारकांची मुजोरी, नगर पालिका प्रशासनाची कमजोरी.

अतिक्रमण धारकांची मुजोरी, नगर पालिका प्रशासनाची कमजोरी.
ads images
ads images

कोंडवाड्या समोरील काढण्यात आलेले अतिक्रमण जैसे थे.

वणी : वणी नगर पालिकेच्या मालकीचे असलेल्या शहरातील टुटी कमान चौका जवळील कोंडवाड्या समोर काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे, परिणामी अतिक्रमण हटविण्याची मागणी कोंडवाडा अभिकर्ता यांनी एका पत्राद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली. परिणामी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दिनांक १२ जुलै रोजी कोंडवाडा समोरील अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी सदर अतिक्रमण धारकांने आपले भेल भंडार चे दुकान कोंडवाड्यासमोर आणुन लावले आहे. त्यामुळे आता जनावरांना कोंडवाड्यात टाकायचे कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे नगर पालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा दोन दिवसांत "जैसे थे" झाल्याने अतिक्रमण धारकाची मुजोरी तर नगर पालिका प्रशासनाची कमजोरी दिसून येत आहे!

Advertisement

सविस्तर वृत्त असे की, वणी शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून मुख्य रस्त्यावर बस्तान मांडले आहे. परिणामी रहदारीस अडथळा निर्माण झाला असून कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर पालिकेच्या मालकीचा शहरातील टुटी कमान चौक जवळ कोंडवाडा आहे. हा कोंडवाडा शहरातील आणि परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी उपयोगी आहे. मात्र काही दिवसांपासून हा कोंडवाडा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला आहे. सदर कोंडवाडा समोर भेल सेंटर व चॉय कॅटीन वाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे  शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी कोंडवाडा अभिकर्ता यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे २०२२  म्हणजेच चार वर्षांपासून कोंडवाडा समोरील अतिक्रमण हटविण्यासाठी पत्रव्यवहार केल्यानंतर शुक्रवारी दिनांक १२ जुलै ला सकाळी सदर अतिक्रमण काढण्यात आले मात्र दोन दिवसांत अतिक्रमण जैसे थे झाल्याने आता जनावरांचा बंदोबस्त करायचा तरी कसा असा प्रश्न कोंडवाडा अभिकर्ता यांच्या समोर उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे नगर पालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...