वणी:- आज दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता वणी पोलिस स्टेशनच्या आवारात मोहरम,व गुरुपौर्णिमा उत्सवा दरम्यान शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी, म.वि.मं.च्या इंजिनिअर अर्के, वाहतूक शाखेच्या सपोनी सीता वाघमारे,न.प.चे कर अधिक्षक हागोणे, तसेच पोलिस अधिकारी व बिट जमादार उपस्थित होते.
या सभेमध्ये सर्व सभासदांनी वणी शहरातील अतिक्रमण व वाहतूक समस्या बाबत आवाज उठविला. काही वर्षांपूर्वी शहरातील रस्ते अरुंद होते ते रस्ते आज मोठे झाले. शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे.
परंतु व्यापारी बांधवांनी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे प्रत्येक चौकात रहदारी ठप्प होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होऊन तिथे सभा, व अन्य कार्यक्रम घेतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन सर्व सामान्य नागरिकां याचा त्रास सहन करावा लागतो त्या मुळे शिवाजी महाराज चौकात कोणालाही सभा,व कार्यक्रम घेण्यास परवानगी देऊ नये.असे कमेटिच्या बैठकीत सर्व सदस्यांनी आवाज उठविला.
तसेच अल्पवयीन मुले दुचाकी वाहनाने भरधाव वेगाने चालवीतात त्यावर आवर घालावा अशाही सूचना केल्या त्यावर नविन कायद्या नुसार अल्पवयीन मुले दुचाकी वाहन चालवित आढळल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार बेहराणी यांनी दिली.
यावेळी मोठ्या संख्येने शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.