वणी:- येत्या शैक्षणिक वर्षात २०२४ -२०२५ साठी आर्थीक सहाय्य योजने साठी महाराष्ट्रातील चुनखडी,डोलोमाईट,बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक
संस्थे मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत
सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्ती करीता पहिली ते चौथी,पाचवि ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आ.टि.आय.पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम ( बि.एस.सी.कृषी सह) बि.ई, एम.बि.बि.एस.,एम.बि.ए.यांना
वार्षिक अर्थसाहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल( https: ll schol arships.gov.in.) वर
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.अंतिम
तारीख ३१ ऑगस्ट पर्यंत आहे.
प्रि मॅट्रिक साठी आहे.आणी पोष्ट मॅट्रिक साठी ३१ ऑक्टोबर पर्यंत आहे.ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती
पोर्टल वर प्रदर्शित केली आहे.
अर्जाची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.अशी माहिती व्हि.टी.थॉमस
कामगार कल्याण आयुक्त नागपूर यांनी दिली.तसेच प्रभारी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक दवाखाना वणी यांच्याशी संपर्क साधावा.