Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *शेतकरी व सर्वसामान्यांसाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु*

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु*
ads images
ads images
ads images

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु*

Advertisement

वणीत चालतं-फिरतं जनहित कार्यालयाचे थाटात उद्घाटन एका कॉलवर मिळणार विविध शासकीय योजनेसाठीची मदत*

Advertisement

✍️रमेश तांबे

Advertisement

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-शेतकरी, महिला व सर्वसामान्यांसाठी विविध योजनेसाठी लागणा-या मदतीसाठी वणीत चालतं-फिरतं जनहित केंद्र सुरु करण्यात आले. गुरुवारी दिनांक 4 जुलै रोजी दु. 12 वाजता खाती चौक येथील कार्यालयात या केंद्राचे थाटात उद्घाटन झाले. दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आला. फक्त एक कॉलवर या जनहित केंद्राद्वारे सर्वसामान्यांना मोफत शासकीय योजनेसाठी लागणारी मदत केली जाणार आहे. खा. प्रतिभा धानोरकर व वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनातून व संजय खाडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते फित कापून जनहित केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकरी, विद्यार्थी, महिला, दिव्यांग, निराधार यांची होणारी धावपळ, योजनेचा लाभ घेण्यासंबंधी असलेली अपुरी माहिती. तांत्रिक अडचणी यामुळे अनेक लाभार्थी हे वंचित राहतात, ही समस्या लक्षात घेऊन हे जनहित केंद्र सुरु करण्यात आले आहे, असे मनोगत संजय खाडे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. देविदास काळे होते. जनहित केंद्राचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे ते लाभा पासून वंचित राहणार नाही, असे मनोगत काळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. यावेळी जयसिंग गोहोकार, घनश्याम पावडे, संध्या बोबडे, काजल शेख इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.

-बॉक्स-

काय आहे चालतं-फिरतं जनहित केंद्र?शासनाच्या विविध योजनेचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी कोणती कागदपत्र जोडावी, ऑनलाईन अप्लाय कसे करावे? याची पद्धत व तांत्रिक माहिती अनेक लाभार्थ्याला नसते. अशा लाभार्थ्यांना हेल्पलाईनवर (9637375455) संपर्क साधावा लागणार आहे. संपर्क करताच जनहित केंद्राची टीम त्या गावात किंवा लाभार्थी राहत असलेल्या ठिकाणी पोहोचणार व लाभार्थ्यांला मदत करणार. याशिवाय खाती चौक येथील कार्यालयात देखील लाभार्थ्यांना मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे.

कार्यक्रमाला सुरेश काकडे, प्रा. शंकर व-हाटे, राजेंद्र कोरडे, पुरुषोत्तम आवारी, अल्का महाकुलकर, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, अनिल देरकर, तेजराज बोढे, अशोक नागभिडकर, अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, मंदा बांगरे, संगिता खाडे, निलीमा काळे, प्रमिला चौधरी, किरण कुत्तरमारे, संगिता मांढरे, डेव्हिड पेरकावार, डॅनी सँड्रावार, महादेव तडेवार, अनंतलाल चौधरी, विकेश पानघाटे, प्रमोद लोणारे, विलास चिकटे, संजय सपाट, सुरेश बनसोड, प्रदीप खेकारे, अशोक पांडे, विठ्ठल पिंपळे, प्रेमनाथ मंगाम, नागोराव आवारी, कुणाल पिंपळे, प्रवीण बदमवार, देवराव देउळकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रमोद वासेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मदत झालेले लाभार्थी, मदतीसाठी आलेले लाभार्थी यांच्यासह सर्वसामान्यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

वणीतील बातम्या

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

वणी:- वणी येथील जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने गणेशपूर रोड वरील मंडळाच्या नवीन कार्यालयात १ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक...