आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
दिनांक १ जुलै २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक डाॅक्टर डे व जागतिक क्रुषी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या वरोरा यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मंचावर डॉ प्रफुल खुजे वैद्यकीय अधीक्षक , श्री सुधाकर कडु महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवनचे विश्वस्त , श्री राजेंद्र मर्दाने ज्येष्ठ पत्रकार, प्रविण मुधोळकर आनंदवन मित्र मंडळ अध्यक्ष,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका उपस्थित होते.मान्यवरांनी वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र,व डॉ. बिधान चंद्र राय यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.वंदना बरडे अधीसेवीका यांनी जागतिक डॉक्टर डे विषयी कार्यक्रमांत प्रास्ताविक केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की आजचा दिवस खुप मौल्यवान आणि आदर्शांप्रतीचा आहे.त्यांनी उपस्थितांना आयोजित कार्यक्रमात सर्व डॉ.ना डॉ डे च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.डाॅ डे हा डॉ
बिधान चंद्र राय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.त्याच प्रमाणे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी यांच्या प्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्याकरिता क्रुषी दिवस म्हणून साजरा केला जातो.तसेच या दिवशी आणखी ५ विषेश दिवसांचे महत्व समजावून सांगितले ते विषेश दिवस म्हणजे भारतीय स्टेट बँक स्थापन दिवस, जागतिक विनोद दिवस,जी एस. टी. दिवस, चार्टर्ड अकाऊंट दिवस, व राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवस, यानिमित्ताने सर्व दिवसांचे महत्व समजावून सांगितले त्यांच्या शूभेच्छा दिल्या.शेतकर्या प्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्यात करीता हरित क्रांती चे जनक म्हणून वसंत राव नाईक यांची जयंती साजरी केली जाते.सर्व डॉ क्टरांनी रूग्णा विषयी आत्मीयता,आदर, प्रेम, सन्मान वापरून रुग्ण सेवा करावी .सोबत आपले कर्तव्य,कर्म, जबाबदारी व्यवस्थीत पार पाडावी.आपली व आपल्या परीवाराची आरोग्याची काळजी घ्यावी. आपले कार्य हे खुप मोलाचे आहे.आणी नोबेल कार्य आहे.याला कुठेही तडा जाऊ नये यांची काळजी घेऊन रुग्णसेवा द्यावी.कारण देवानंतर डाॅक्टरांना मानणारे खुप लोक आहेत.त्याची जपवणूक व्हावी.तसेच प्रवीण मुधोळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कडूसाहेब ज्येष्ठ नागरिक यांनी बाबा आमटे यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.राजेंद्र मर्दाने ज्येष्ठ पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले.डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक व कार्यक्रमांचे अध्यक्ष यांनी वसंत राव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व डॉ डे निमित्त शुभेच्छा दिल्या व डॉक्टरांच्या कार्याप्रती मार्गदर्शन केले.बहूऊद्देशीय मीत्रमंडळ व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.मंडळी यांचा शाल व झाड ???? देऊ सत्कार करण्यात आला.व या कार्यक्रमाचे औचित्य साधून व्रुक्षारोपण करण्यात आले.सूत्रसंचालन सोनाली राईसपाईले व आभारप्रदर्शन सतीश येडे यांनी केले.कार्यक्रमात डॉ प्रफ्फूल वैद्यकीय अधीक्षक खूजे, डॉ वंदेश शेंडे नेत्रशल्य चिकित्सक डॉ स्नेहाली शिंदे, डॉ गेडाम स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ प्रवीण बुटोलीया अस्थीरोगतज्ञ व वर्षा भुसे भौतिक उपचार तज्ञ डॉ जाधव वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे अधीसेवीका, सरस्वती कापटे, इंदिरा कोडापे, संगिता नकले, ओमकार मडावी लक्ष्मीकांत ताले यांनी मेहनत घेतली.सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.विषेश म्हणजे पत्रकार संघाकडून एका शेतकऱ्याचाही सत्कार करण्यात आला.त्यांचे नांव राहुल देवडे असून तरुण शेतकरी आहे . आजकाल तरूण शेतीकळे वळत नाही पण राहुल देवडे हे शेतकरी आहे प्रामुख्याने सांगावेसे वाटते.सुधाकर कडु महारोगी सेवा समिती विस्तव यांनी रुग्णालयिन अधिकारी व कर्मचारी यांच्या विषयी विशेष गौरव ऊदगार काढलें व भरभरून प्रशंसा केली.आणी रुग्णालयांचा कायापालट झाल्याचेही त्यांनी कौतुक केले.शेवटी डॉ बिधान चंद्र राय यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कारण याच दिवशी त्यांचा जन्म व मृत्यू झाला होता.सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद मानून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...