रात्री सर्पदंशासारखे अनुचित प्रकार घडण्याची भिती, अन्यथा कार्यालयावर धडक, संजय खाडे यांचा इशारा
वणी - गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरु आहे. संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागातील नागरिकांनी त्रास सहन केला. आता पावसाळा सुरु झाला असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साप, विंचू अशा सरपटणा-या प्राण्यांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी हे प्राणी दिसत नसल्याने अनेकाना या प्राण्यांचा दंश होतो. प्रसंगी लोकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे मंदर येथील रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयात संजय खाडे यांच्या नेतृत्वात अधिका-यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देत विद्युत वितरण सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देते वेळी गणेश, देवराव देऊळकर, किशोर बोढे, विजय परसुटकर, प्रतिक बुरडकर, गणेश निखार, अरविंद भट, प्रवीण उपे, संदीप गोपाळकर, संदीप निब्रड, बंडू उपरे, वैभव सोयाम, प्रवीण करडभुजे, आशिष बुच्चे, विजय बोढे, गुरुनाथ आडे, अल्ताफ शेख, अमोल चोपणे, संजय कापसे, महादेव बुचे यांच्यासह मंदर येथील रहिवासी उपस्थित होते.