Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ओबीसी वसतिगृह त्वरित...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार

ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन  कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार

ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी, जि.यवतमाळ ने दिला इशारा,ओबीसी विदयार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेतच

वणी:महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी राज्यातील ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यामध्ये 72 वस्तीगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला.सत्र 2023- 2024 मध्ये वस्तीगृह प्रवेशाचे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले;परंतु वस्तीगृहात प्रवेश दिला नाही.अजूनही विदयार्थी वस्तीगृह प्रवेश्याच्या प्रतिक्षेत आहे.1 जुलै पासून महाविद्यालये सुरु होत आहे;परंतु अजूनही वस्तीगृह सुरू करण्यासाठी सरकार, प्रशासनाच्या हालचालींना वेग आलेला नाही;त्यामुळे अनेक विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करून शिक्षण घेत आहे. मागच्या सत्रात ज्या विदयार्थ्यांनी वस्तीगृह प्रवेशासाठी अर्ज भरले होते;त्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात त्वरित प्रवेश देण्यात यावा,सत्र 2024 - 2025 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करावी,
कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग 11वी, 12वी )ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी वस्तीगृहात प्रवेश देण्यात यावा,कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग 11वी, 12वी ) ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करावी,वस्तीगृह प्रवेशासाठी व आधार योजनेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन वगळण्यात यावे,
शासन निर्णय 16 मे 2012 नुसार एस.सी. विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात ओबीसी विद्यार्थ्यांचा कोटा 5% करण्यात आला आहे.तो रद्द करून पुर्ववत 20% करण्यात यावा,सन 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून उच्च शिक्षणात ओबीसी विद्यार्थीनींना 100% फी सवलत देण्यात येत आहे.तशीच सवलत ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करावी. तसेच फ्री शिप सवलत साठी उत्पन्न मर्यादा रद्द करण्यात यावे, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2019-2020 या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात आली.ओबीसी विदयार्थ्यांना दरवर्षी 500 रुपये खर्च करून आवेदन पत्र सादर केले;परंतु सन 2019 ते 2024 या पाच वर्षात त्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली नाही.त्या सर्व विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी, मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, महाज्योती मार्फत ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांना NEET, IIT परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण व मोफत टॅबलेट योजना अर्ज प्रक्रिया त्वरित सुरु करावी,गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती देण्यात यावी. अशी मागणी आज गुरुवार, दि. 27 जून 2024 रोजी ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी च्या वतीने उपविभागीय अधिकारी,वणी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, यवतमाळ यांच्या कडे केली.मागण्या त्वरित पूर्ण केल्या नाही;तर इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात मुक्काम आंदोलन करू असा इशारा ओबीसी जनगणना समितीचे वतीने सहाय्यक संचालक ईतर मागास बहुजन कल्याण विभाग, यवतमाळ यांना निवेदनातून देण्यात आला.यावेळी  ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष प्रदिप बोनगीरवार, निमंत्रक मोहन हरडे, निलिमा काळे, सविता रासेकर, शामरावजी घुमे, पांडुरंगजी पंडिले, प्रभाकरजी मोहितकर, सुरेश मांडवकर, रामजी महाकुलकर, सुभाष खुजे, गुलाबजी वांढरे, नामदेवराव जेणेकर, विलास देठे, पुंडलीकराव मोहितकर, विलास शेरकी, आसिफ शेख, भारत जेऊरकर, गणपत ठाकरे, ऍड. दिलीप परचाके, भैयाजी पिंपळकर, मनोज काळे, अशोकराव चौधरी, प्रदिप बोरकुटे, लक्ष्मणजी इद्दे, प्रशांत महाकुलकर, बबन ढवस, राजू पिंपळकर, धिरज भोयर, रवि क्षीरसागर, मनोज नवले, संजय गायकवाड, आणि सुरेश राजूरकर इत्यादी समाजबांधव उपस्थीत होते.

72 ओबीसी वस्तीगृह सुरु करण्यासंदर्भात सरकारने आदेश मार्च 2024 मध्ये आदेश काढून वस्तीगृह प्रवेश अर्ज मागितले.निवड यादीही लागली;परंतु प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला नाही.गाव खेड्यातील ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत आहे.ओबीसी विदयार्थ्यांच्या मागण्या 1 जुलै 2024 पर्यंत पूर्ण केल्या नाही;तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग, यवतमाळ येथील कार्यालयात सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मागण्या पूर्ण होइपर्यंत मुक्कामी राहून मुक्काम आंदोलन करणार. -
ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी, जि.यवतमाळ

ताज्या बातम्या

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* 30 June, 2024

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-अंगणवाडी सेविका मदतनीस यांना...

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे*    *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार* 30 June, 2024

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या...

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली  पोलीस कस्टडीत आत्महत्या* 30 June, 2024

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली पोलीस कस्टडीत आत्महत्या*

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली पोलीस कस्टडीत आत्महत्या* राजेश येसेकर भद्रावती...

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास*    *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना* 29 June, 2024

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त,संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांचे निवेदन 28 June, 2024

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त,संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांचे निवेदन

वणी - गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरु आहे. संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागातील...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त*    *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन* 28 June, 2024

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त* *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त* *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन* ✍️रमेश...

वणीतील बातम्या

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त,संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांचे निवेदन

वणी - गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरु आहे. संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागातील...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त* *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त* *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन* ✍️रमेश...

महिलांसाठी कल्याणकारी धोरण राबविणारे पहिले राज्य : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्प (Budget) सादर केला...