Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *विद्यार्थ्यांनी स्पर्धा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी: ऍड. दिपक चटप*

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी:  ऍड. दिपक चटप*
ads images
ads images

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी:ऍड. दिपक चटप*

 

Advertisement

✍️रमेश तांबे

Advertisement

वणी तालुका प्रतिनिधी

 

                                       

वणी:--कोणताही अभ्यास करतांना स्पर्धा ही तुमच्या  सहकाऱ्याशी न करता जागतिक क्षेत्राशी असावी.त्यामुळे तुमच्यातील क्षमतांना अमर्याद पंख फुटतील.म्हणुन स्पर्धा स्वत: शीच करावी, त्या द्वारे आपल्यामधील उणिवांवर मात करावी.म्हणजे यशाचे शिखर पादाक्रांत होईल.असा मुलगामी सल्ला जागतिक प्रतिष्ठेचा स्कॉलर विद्यापीठ लंडनचा वेव्हबिन पुरस्कार सन्मानित विधीज्ञ ऍड. दिपक चटप यांनी उपस्थितांना दिला.मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड वणी -मारेगांव -झरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात " देश विदेशातील शिष्यवृत्तीच्या संधी " या विषयावर मार्गदर्शन करतांना वरील विचार व्यक्त केले.राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीदिन आणि राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीदिनाचे औचित्याने दि. २३जून रोजी दुपारी ३ वाजता कुणबी समाज सांस्कृतिक भवन,वणी येथे संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर होते.तर सावित्रीआई फुले वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण राजुरकर,मसेसं जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे,शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी,मसेसं मारेगांव अध्यक्ष ज्योतिबा पोटे, जिजाऊ ब्रिगेड वणी अध्यक्ष भारती राजपुत,मारेगांव अध्यक्ष लिना पोटे,कपील शृंगारे,प्रविण खंडाळकर आदी मान्यवर अतिथी म्हणुन उपस्थित होते.याप्रसंगी ऍड. दिपक चटप यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्या अंधानुकरणावर बोट ठेवले.विद्यार्थ्यांनी आपले क्षेत्र निवडतांना जागतिक  दृष्टीकोन ठेवावा कारण आत्ताची स्पर्धा ही ग्लोबल आहे. सोबतच देश व जागतिक पातळीवर उपलब्ध शिष्यवृत्तीच्या बाबत त्यांनी अवगत करून मेडीकल आणि इंजिनियरींगच्या पलीकडे बघण्याची सवय करावी,असे विवेचन केले.पुस्तके वाचलीच पाहीजे आणि कोणत्याही क्षेत्रात असा,त्यातील तज्ञ बना.असा सल्ला दिला.याप्रसंगी रूपाली मोहितकार यांचा डिवायएसपी म्हणुन निवड झाल्याबद्दल,शुभम वागदरकर यांचा परदेशातील उल्लेखनिय यशाबद्दल तसेच विर भगतसिंग विद्यार्थी मंडळातील शासकीय सेवेत निवड झालेल्या अन्य विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला.सोबतच तिनही तालुक्यातील दहावी,बारावी आणि अन्य प्राविण्यप्राप्त यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.प्रासंगिक मनोगत प्रा.बाळकृष्ण राजुरकर,अनंत मांडवकर,यांनी व्यक्त केले.जिजाऊ,शाहु महाराज यांच्या अभिवादनाने आणि सामुहिक जिजाऊ वंदनेने सोहळ्यास प्रारंभ झाला.प्रास्ताविक अजय धोबे,सुत्रसंचालन मारोती जिवतोडे व दत्ता डोहे तर आभार ज्योतिबा पोटे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भाऊसाहेब आसुटकार,सुरेन्द्र घागे,वसंत थेटे,संजय गोडे,संदीप गोहोकार,आशिष रिंगोले,केतन ठाकरे,गणेश बोंडे,लहु जिवतोडे,आशिष झाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन. 28 September, 2024

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन.

वणी:- लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ 'मानवता सेवा सप्ताह' अंतर्गत...

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

वणीतील बातम्या

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन.

वणी:- लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ 'मानवता सेवा सप्ताह' अंतर्गत...

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...