Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / धनगर अधिकारी कर्मचारी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत
ads images
ads images

सूर्यभान चिडे ची तालुकाध्यक्षपदी तर प्रवीण वैद्य ची सचिवपदी निवड

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान  वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी वणी तालुक्याची सभा सम्पन्न झाली व नवीन कार्यकारिणी यावेळी गठीत करण्यात आली . सभेच्या अध्यक्ष स्थानी आदरणीय पांडुरंगजी पंडिले साहेब होते तसेच   मार्गदर्शक म्हणून धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मीप्रसाद  वाघमोडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.विलास शेरकी,आशिष साबरे,रघुनाथ कांडारकर,गजानन तुराळे, जिल्हा शिक्षक नेते राजेश भाऊ निरे,विनोद खंडाळकर, वसंतराव गोरे, काशिनाथ पचकटे, भाऊराव मत्ते, विलास गवारकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद सहविचार सभा संपन्न झाली. सभेत राज्य अधिवेशन यशस्वी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यांनतर वणी तालुका कार्यकारिणी ची सर्वांनुमते निवड करण्यात आली त्यात वणी तालुक्यातून जिल्हा प्रतिनिधी म्हणून जेष्ठ नेते वसंतराव गोरे यांची, आणि तालुका अध्यक्ष म्हणून सर्वपरिचित, जिल्हा शिक्षक नेते सूर्यभान चिडे , तालुका सचिव म्हणून जिल्हा परिषद चे धडाडीचे नेते प्रवीण वैद्य यांची, कार्याध्यक्ष म्हणून किशोर बुच्चे युवा नेते, तर कोषाध्यक्ष म्हणून सुरेंद्र बुच्चे तालुका उपाध्यक्ष म्हणून धडाडीचे नेते विलास चामाटे यांची, संघटक म्हणून धडाडीचे  महसूल चे नेते रघुनाथ कांडारकर आणि तसेच  प्रसिद्धीप्रमुख म्हणून गजानन तुरारे तालुका महिला प्रतिनिधी म्हणून विद्या सांबरे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली तसेच बाकी विभागातील कर्मचारी यांना संधी मिळावी म्हणून पुढील मासिक सभेत उर्वरित पदे भरण्याचे ठरले.याप्रसंगीमंचावर राज्यप्रतिनिधी पवन थोटे,  जिल्हा कार्याध्यक्ष भूमन्ना कसरेवार, जिल्हा सचिव संदीप खांदवे, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीप्रसाद वाघमोडे उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणी चे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.सभेचे सूत्रसंचालन आशिष साबरे सरांनी, प्रास्ताविक संदीप खांदवे सरांनी केले आणि आभार प्रदर्शन  गजानन तुरारे सर यांनी मानले.

ताज्या बातम्या

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* 27 June, 2024

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांनी...

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार*    *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* 27 June, 2024

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश*

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*अवैध रेती पंचनामा केले ? रेती तस्करांनी अंधारात संपूर्ण रेतीचे ढिगारे साफ केले*    *महसूल अधिकाऱ्याच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह* 27 June, 2024

*अवैध रेती पंचनामा केले ? रेती तस्करांनी अंधारात संपूर्ण रेतीचे ढिगारे साफ केले* *महसूल अधिकाऱ्याच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह*

*अवैध रेती पंचनामा केले ? रेती तस्करांनी अंधारात संपूर्ण रेतीचे ढिगारे साफ केले* महसूल अधिकाऱ्याच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह ✍️दिनेश...

*ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन  कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार:राजू पिंपळकर* 27 June, 2024

*ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार:राजू पिंपळकर*

*ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार:राजू पिंपळकर* ✍️रमेश तांबेवणी...

ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन  कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार 27 June, 2024

ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार

वणी:महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी राज्यातील ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यामध्ये 72 वस्तीगृहे...

वणीतील बातम्या