मारेगाव:महावितरण विभागाने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या २ दिवसात पूर्णत्वास न्यावी व वारंवार होत असलेला विद्युत पुरवठा अखंडित करावा व भारनियमन रद्द करावे अन्यथा महावितरणच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षनेते राजु उंबरकर यांनी निवेदनाद्वारे महावितरण विभागाला दिला आहे.
निसर्गाच्या अवकृपेने मृग नक्षत्र लागून सुद्धा आजवर एक हि जोरदार पाऊस तालुक्यात झाला नाही. त्यामुळे पेरण्यातील बियाणे जमिनीतील उष्णतेने जळून जात आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याकडे ओलिताची व्यवस्था व मुबलक पाण्याचे स्त्रोत आहेत. या आधारे ते हि शेती करू शकतात, मात्र त्यासाठी लागणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांपुढील हा ही पर्याय बंद झाला आहे. परिणामी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. देखभाल आणि दुरुस्तीचे कारण सांगून तालुक्यातील सर्वच भागात वारंवार वीज पुरवठा खंडित केल्या जात आहे. याबाबत सर्व सामान्यांनी काही हि विचारणा केल्यास त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात येतात.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरण ची कामे पूर्ण केली जातात. दर २५ वर्षात विजेची तारे आणि खांब बदलणे अनिर्वाय आहे. परंतु आज मी लहानाचा मोठा झालो तरी सुद्धा हे तारे बदलताना पाहिलेले नाही. बरबऱ्याच ठिकाणी जीर्ण झालेले खांबे सुद्धा बदलले नाही त्यामुळे हे खांब वाकल्या गेले आहे. बहुतांश ट्रान्सफार्मर चे बॉक्स बदलण्यात आलेले नाही. अनेक बॉक्सचे दारे उघडे असतात. यातून अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढण्यात आले. लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेने तालुक्यात एक हि उपकेंद्र स्थापन झालेले नाही. त्यामुळे वणी आणि पांढरकवडा येथून विद्युत पुरवठा करण्यात येतो. याकडे स्थानिक लोकाप्रतीनिधिनी लक्ष देऊन तालुक्यात २२० के.व्ही. उपकेंद्राची उभारणी करावी. पावसाळा तोंडावर असताना महावितरण कडून देखभाल दुरुस्तीची कामे अद्याप सुरू करण्यात आले आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या दैनदिन जीवनावर आणि व्यवहारावर होत आहे. वादळी वारा आणि पावसा मुळे विजेचे खांब किंवा तारे तुटून पडल्यास कित्येक दिवस ते तसेच पडून राहत आहेत यावर आपले कर्मचारी कोणतीही कार्य तत्परता दाखवीत नाही. तर अनेकदा गंभीर प्रसंगी जनतेचे फोन काल उचलत नाही. यासर्व बाबीला जबाबदार कोण ? असा प्रश्न राजू उंबरकर यांनी उपस्थित केला आहे.
महावितरणच्या भोंगळ आणि अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अद्यापही महावितरण कडून देखभाल दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेली नाहीत. यामुळे मारेगाव तालुक्यातील अनेक गावांना लोड शेडिंग चा फटका बसत आहे. त्यामुळे आपण या सर्व प्रकारात स्वतः लक्ष घालून महावितरण विभागाने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या २ दिवसात पूर्णत्वास न्यावी व वारंवार होत असलेला विद्युत पुरवठा अखंडित करावा व भारनियमन रद्द करावे अन्यथा महावितरणच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यातून होणाऱ्या सर्व परिणामास महावितरण सर्वस्वी जबाबदार असेल असे मत उंबरकर यांनी केले.यावेळी शेतकरी नामदेव पोटे, अतुल खिरटकर, देवेंद्र पाल, उमेश राऊत, गांधी खिरटकर, नितीन मिलमिले, रामकृष्ण पार्लेकर, रवींद्र बोढे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रेगे, धनंजय त्रिंबके, रुपेश ढोले, उदय खिरटकर, किशोर मानकर, सुरज नागोसे, शुभम भोयर, समीर शेख आदी उपस्थित होते.