Home / यवतमाळ-जिल्हा / मराठ्यांच्या दबावाखाली...

यवतमाळ-जिल्हा

मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
ads images
ads images

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा, सगेसोयरे वर ओबीसींचा आक्षेप

मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर हे आंदोलन संपूर्ण राज्यात व विदर्भात देखील होईल, संपूर्ण ओबीसी समाज हा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेच्या पाठीशी उभा आहे, याची दखल सरकारने घ्यावीच, असे मत विदर्भवादी ओबीसी नेते व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी आज (दि.२०) ला येथे मांडले.

Advertisement

आम्ही दिलेल्या व्याखेप्रमाणे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. ५७ लाख नोंदीचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा आणावा. हैदराबादचे गॅझेट आपल्या राज्यातही लागू करावं. सातारा संस्थानचं गॅझेट लागू करावं, मनोज जरांगे यांच्या या मागण्यांच्या विरोधात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, समस्त ओबीसी समाज व ओबीसी संघटना या ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल असा राज्य सरकारचा कोणताही निर्णय खपवून घेणार नाही.

दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके व प्रकाश शेंडगे यांच्या आंदोलनाला देखील डॉ. अशोक जीवतोडे यांनी दुजोरा दिला आहे. सगेसोयरे वर ओबीसींचा आक्षेप आहे, ओबीसी विरोधातील उमेदवाराला विधानसभेत त्याची जागा दाखवू, असेही डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविले, त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा विश्वास असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. मात्र जरांगेच्या आंदोलनाच्या दबावात येवून जर राज्य सरकार सगे सोयरेचा अध्यादेश काढत असेल तर ओबीसी संघटना व समाज गप्प बसणार नाही. मोठ्या प्रमाणात राज्यात ओबीसीचे आंदोलन होईल व राज्यात बिघडणारी कायदा व सुव्यवस्थेस राज्य सरकार स्वतः जवाबदारी असेल.मराठा समाजाला जे काय आरक्षण द्यायचे आहे ते देत बसावे, मात्र भारतीय संविधान अभ्यासून निर्णय घ्यावा. ओबीसींच्या संवैधानीक अधिकारात घुसखोरी होवू नये. दबावाच्या राजकारणाला बळी पडू नये. वारंवार ओबीसीला गृहीत धरू नये, अन्यथा खबरदार असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.

वणी/ प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युवकांचा मोठ्या संख्येने...

कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.

वणी प्रतिनिधी - खासदार प्रतिभाताई धानोरकर, व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक,...