*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी: शेतकरी विकास विद्यालय मांगली येथील इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्याहून अधिक व परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आज बुधवार दि .१२ जून २०२४ रोजी मुख्या . शशांक मुत्यलवार सर यांच्या हस्ते झाले . त्यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून पालक श्री . सुनिल पाईलवार श्री .पारखी सर श्री . चामाटे सर ;श्री .नाकले सर ;श्री . काळे सर उपस्थित होते .
या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविकेत दहावी परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्याथ्र्याच्या पाठीवर कौतूकाची थाप देण्यासह पुढिल वाटचालीसाठी उत्तेजन देण्याच्या दृष्टीकोनातून हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री . चिट्टलवार सरांनी दिली .
मानवी जीवनात शिक्षणाला खूप महत्व असून ते मिळविण्यासाठी विद्यार्थीनी ताकदीने उभे राहून जिद्दीने अभ्यास करावा . उदयाचा दिवस सोन्याचा करायचा असेल तर आजच कष्ट करा आणि पुढे पूढे जा असे आव्हाहन नाकले सरांनी व्यक्त केले .
गेल्या काही वर्षापासून शेतकरी वि .विद्यालयाचे माझे सहकारी शिक्षकवृंद हे विद्याथ्र्यांना प्रगतीच्या वाटेवर नेण्यासह त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन व मदत करत आहेत . म्हणून शिक्षणातून कौशल्य आत्मसात केले नाही तर शिक्षण व्यर्थ ठरते . आपण विद्यार्थीनी आपल्या पालकांसाठी काय करू शकता याचा विचार करा . अपयशावर मात करून पुढे जाण्याची तयारी ठेवा . विपरीत परीस्थितीत निराश न होता त्याला कसे तोंड देता येईल आणि पूढे काय करता येईल याचा विचार करून पुढील शैक्षणिक जीवनात भरघोस ;घवघवीत यश संपादन करा ;पालकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा असे प्रतिपादन अध्यक्षिय भाषणातून मुख्या . शशांक मुत्यलवार सरांनी मांडले .
शेवटी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री .विनोद भादीकर व श्री .जनार्दन काटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...