Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / छत्रपती शिवाजी महाराजानंतर...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार चालवणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर-विकास चिडे (राष्ट्रीय प्रबोधनकार)

छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार चालवणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर-विकास चिडे (राष्ट्रीय प्रबोधनकार)

बोरी गदाजी येथे हर्षोउल्हासात साजरी झाली राजमाता पुण्यश्लोक यांची 299 वी जयंती

मारेगाव:छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार सांभाळणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.अहिल्यादेवी ने राज्यकारभार चालवताना चरित्र जोपासले, महिलांची पहिली फौज निर्माण करणारी राणी म्हणजे अहिल्यादेवी तसेच स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे कार्य अहिल्यादेवी होळकर ने केले.छञपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सांभाळणारी प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर असे प्रतिपादन जाहीर समाज प्रबोधन मेळाव्यात श्री विकास चिडे यांनी केले. काल दिनांक 31 मे 20234 रोज शुक्रवार ला बोरी गदाजी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.संजय लव्हाळे सर होते तर उदघाटक म्हणून श्री संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन तुराळे, काशिनाथ पचकटे, हुसेन करडे, प्रदीप साबरे, वसंतराव बच्चे, बंडू डाहूले, अनिल बोबडे, अमर पिंपळकर, श्री पेंदाम सर, सौ मंगला करडे, गंगा करडे, अनिता राजूरकर, छाया राऊत, चंद्रकला गेडाम, शांताबाई निखाडे मंचावर उपस्थित होते.

जयंतीनिमित्त समाजातील जेष्ठ व्यक्तींचा यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या देवांश साबरे आणि प्रणय करडे या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री आशिष साबरे यांनी केले तर प्रस्तावना श्री गजानन तुराळे सर यांनी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...