Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / उद्या बोरी गदाजी येथे...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

उद्या बोरी गदाजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

उद्या बोरी गदाजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधनाच्या  कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य श्री विकास चिडे सर यांचे जाहीर व्याख्यान

मारेगाव: तालुक्यातील बोरी गदाजी येथे दिनांक 31 मे 2024 रोज शुक्रवार ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती महोत्सवाचे सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले आहे.राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वैभवशाली तसेच गौरवशाली इतिहास समाजाला माहीत व्हावा या दृष्टिकोनातून समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे सायंकाळी 7.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य श्री विकास चिडे सर यांचे जाहीर व्याख्यान यावेळी आयोजित केले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा. संजय देरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री विकास चिडे सर (राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजेरिवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य) उपस्थित राहणार आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा प्रा.संजय लव्हाळे सर उपस्थित राहतील.प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन तुराळे सर, श्री काशिनाथ पचकटे सर, प्रवीण नांने सरपंच ग्रामपंचायत बोरी, श्री प्रदीप साबरे उपसरपंच, श्री हुसेन करडे, रामचंद्र करडे , अतुल बोबडे, मंगलाबाई करडे, गंगाताई करडे इत्यादीसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहे.

तेव्हा या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या आणि समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाला जनतेनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच व राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला विचार मंच, बोरी गदाजी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...