Home / यवतमाळ-जिल्हा / निमाकॉन यवतमाळ-२०२४...

यवतमाळ-जिल्हा

निमाकॉन यवतमाळ-२०२४ जल्लोषात संपन्न

निमाकॉन यवतमाळ-२०२४ जल्लोषात संपन्न
ads images
ads images

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे करण्यात आले होते आयोजन

यवतमाळ:नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे रविवार , दि. १७ मार्च २०२४ रोजी स्थानिक सर विश्वेश्वरैय्या हॉल, शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन महाविद्यालय, धामणगाव रोड, यवतमाळ येथे एकदिवसीय वैद्यकीय अधिवेशन "निमाकॉन यवतमाळ- २०२४" मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

      कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ विनायक टेंभुर्णीकर(माजी अध्यक्ष निमा केंद्रीय शाखा) यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ आशुतोष कुलकर्णी (अध्यक्ष निमा केंद्रीय शाखा) होते , तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ योगेश देशमुख साहेब,(तहसीलदार यवतमाळ), डॉ दिलीप वांगे(रजिस्ट्रार एम. सी. आय. एम., मुंबई), डॉ सुधाकर मोहिते (उपाध्यक्ष , निमा केंद्रीय शाखा), डॉ शांतीलाल शर्मा (कोषाध्यक्ष, निमा केंद्रीय शाखा), डॉ मोहन येंडे (सचिव, निमा महाराष्ट्र राज्य शाखा), डॉ संजय जोशी (सहकोषाध्यक्ष , निमा केंद्रीय शाखा), डॉ गिरीष डागा (कोषाध्यक्ष एम. बि. एस., निमा केंद्रीय शाखा), डॉ राजु ताटेवार (माजी उपाध्यक्ष, निमा केंद्रीय शाखा), डॉ नारायण जाधव, डॉ श्याम भुतडा(प्राचार्य, पि. आर. पोटे पाटील आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती हे उपस्थित होते, तसेच प्रमुख पाहुण्यांसोबत मंचावर निमा यवतमाळ सदस्य डॉ दिनेश चांडक‌‌‌ (अध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ आनंद बोरा ( सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेश यादव ( कोषाध्यक्ष निमा यवतमाळ) डॉ संजय अंबाडेकर  (उपाध्यक्ष निमा महाराष्ट्र राज्य शाखा), डॉ आलोक गुप्ता (प्रकल्प अधिकारी निमाकॉन यवतमाळ), डॉ आदित्य अढाऊकर ( सहप्रकल्पाधिकारी निमाकॉन यवतमाळ), डॉ शिप्रा राठोड (सहप्रकल्पाधिकारी निमाकॉन यवतमाळ), महिला प्रतिनिधी डॉ कविता बोरकर, डॉ प्राची नेवे, डॉ मनिषा पोहरे इ. उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी धन्वंतरी पूजन करून "आसमंत" या निमा स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले व निमा यवतमाळ चे कर्तृत्ववान सदस्य मा. डॉ नितीन कोथळे यांच्या कार्याचा गौरव म्हणून निमा भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तसेच डॉ विनोद डेहनकर, डॉ प्रविण राखुंडे, डॉ आलोक गुप्ता, डॉ कविता बोरकर, डॉ मनोज पांडे,  डॉ विजय अग्रवाल यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

        या अधिवेशनामध्ये संपूर्ण यवतमाळ जिल्हा व विदर्भातुन सुमारे ३५० आय. एस. एम. डॉक्टरांची उपस्थिती लाभली, सर्वांचे वैद्यकीय ज्ञान अद्ययावत होण्यासाठी डॉ चंद्रकुमार देशमुख सर, पुणे, व डॉ महेश बिर्ला, जळगाव यांनी आयुर्वेद विषयांवर मार्गदर्शन केले तसेच डॉ नरेंद्र वानखेडे, अमरावती, डॉ पियुष पाटील, यवतमाळ, डॉ सागर बोथरा, यवतमाळ, डॉ राजन बारोकर, नागपूर यांनी मॉडर्न मेडिसिन बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, व मेडिकोलीगल समस्यांबद्दल डॉ राजेंद्र खटावकर, डॉ धनंजय कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली, सोबतच निमा अमरावती डिविजनल प्रेसिडेंट , सेक्रेटरी, ट्रेझरर (पि. एस. टी.) वर्कशॉप व बी. ए .एम. एस. पदव्युत्तर विद्यार्थींसाठी पेपर प्रेझेंटेशन सेमिनार सुध्दा घेण्यात आले, दिवसभराच्या ज्ञानार्जनानंतर सायंकाळी ०७ वा. निमा यवतमाळ तर्फे भव्य रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, यामध्ये सोलो डान्स, कपल डान्स, एकपात्री नाटक, मुकनाट्य , लहान मुलांचे डान्स ई. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे तसेच निसर्गाच्या संवर्धनासाठी मोलाचा संदेश देणारे एकापेक्षा एक सरस  सादरीकरण करण्यात आले.

        अधिवेशनाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी डॉ विजय अग्रवाल, डॉ नंदकिशोर बाभुळकर, डॉ सुर्यप्रकाश जयस्वाल, डॉ राजीव मुंदाने( प्राचार्य डा. मा. म. आयुर्वेद महाविद्यालय, यवतमाळ) डॉ लक्ष्मीनिवास सोनी, डॉ मनिष सदावर्ते, डॉ अतिष गजभिये, डॉ नोवेश कोल्हे, डॉ क्षितिजा गुल्हाने, डॉ निरज मोडक, डॉ राजेश माईंदे, डॉ योगेश दुद्दलवार, डॉ प्रफुल्ल खडसे, डॉ पंकज  दिडपाये, डॉ अर्पित चौधरी  इ. सर्व निमा सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मंगेश हातगावकर, डॉ मनोज बरलोटा यांनी केले, सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ आनंद बोरा यांनी केले, तसेच आभारप्रदर्शन डॉ शैलेश यादव यांनी केले, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कविता बोरकर व डॉ हर्षा साव यांनी केले, असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर (जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ ) यांनी कळविले.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...