Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / कानडा येथे महिलांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

कानडा येथे महिलांनी पकडली दारू

कानडा येथे महिलांनी पकडली दारू

कानडा येथील शेतात सुरू होती दारू विक्री

मारेगाव: तालुक्यातील कानडा (पार्डी) येथील महिलांनी काल दिनांक 5 मार्च 2024 रोज मंगळवार ला कानडा येथील शेतातुन दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. 

सविस्तर वृत्त असे की सौ. सारीका पुंडलीक राजुरकर व सौ. नेहा प्रसाद उवस वय 26 वर्षे व्यवसाय शेती, रा. कानडा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ यांनी ना. पो. कॉ. 892 राजु टेकाम वय 40 वर्षे पो. स्टे. मारेगाव यांना नमुद पंचास लेखी सुचनापत्र देवुन कळविले कि, काल दिनांक 05 मार्च 2024 रोजी पोलीस स्टेशन मारेगाव येथे हजर असतांना ग्राम कानडा येथुन फोनद्वारे गोपनीय माहीती दिली.ग्राम कानडा येथील एक इसम हिवरा ते कानडा रोडवर देशी दारु व विदेशी दारुची विक्री करीत आहे अशी विश्वसनीय माहीती महिलांना मिळाली असता

सदर महिला काल दि. 05 मार्च 2024 रोजी सकाळी 10/05 वा. सुमारास मा. ठाणेदार सा. याचे आदेशाने सोबत पो. कॉ. 1353 अतुल सरोदे असे सरकारी वाहनाने ग्राम कानडा येथे जावुन दोन पंचासह हिवरा ते कानडा रोडवर पोहचले असता एक ईसम विना परवाना देशी दारु व विदेशी दारुची विक्री करीत असतांना आढळुन आला. सदर इसम महिलांना पाहुन त्याचे ताब्यातील तिन खाकी रंगाचे पेटी व एक पांढरा थैली तिथेच टाकुन पळुन गेला. पंचानी सांगितले कि, दारु विक्री करणारा इसम हा गावातील गणेश सुरेश फाले वय 35 वर्षे रा. कानडा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ असल्याचे सांगितले. सदर तिन खाकी रंगाची पेटीची व पांढऱ्या रंगाचे थैलीची पंचा समक्ष झडती घेतली असता एका खाकी पेटीत 48 पव्वे, दुसऱ्या पेटीत 28 पव्वे असे 180 मी. ली. क्षमतेचे देशी दारूने भरलेले एकुन 76 पब्वे प्रत्येकी अं. किंमत 80/- रुपये प्रमाणे एकुन अं. किंमत 6080/- रु. चा माल व तिसऱ्या खाकी पेटीत 90 मी. ली. 86 पव्वे असे 90 मी. ली. क्षमतेचे देशी दारूने भरलेले प्रत्येकी किंमत अं. 40/- रुपये प्रमाणे एकुन अं. किं. 3440रु. चा. माल व एका पांढऱ्या थैलीत 180 मी. ली. क्षमतेचे विदेशी दारुने भरलेले प्रत्येकी MD No. 1 मॅकडॉल कंपनीची अं. किंमत 150 रुपये प्रमाणे एकुन अं. किंमत 1050/- रु. चा मुद्देमाल एकुन अं. किंमत 10570/- रु. चा मुद्देमाल अवैद्यरित्या विना परवाना मिळुन आला, वरुन सदर जप्त माल पैकी प्रत्येकी एक 180 ML क्षमतेचा देशी दारुने भरलेली पव्वा, एक 90 ML क्षमतेचा देशी दारुने भरलेली पब्वा व एक MD No. 1 मॅकडॉल कंपनीची सीलबंद करुन सी. ए. सॅम्पलसाठी वेगळा काढुन राखुन ठेवण्यात आली.

सदरचा चतुर्सिमा पाहता पुर्वेस माथनकर यांचे शेती, पश्चिमेस - पिंपळशेंडे यांचे शेत, उत्तरेस - कानडाकडे जाणारा रोड व दक्षिणेस - हिवरा कडुन येणारा रोड अशा चतुर्सिमेत सदरचा घटनास्थळ स्थित असुन घटनास्थळ / जप्ती पंचनामा सुर्य प्रकाशाचे उजेडात दिसत्या व सत्य परीस्थितीचा तयार केल्याची खात्री झाल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथील प्रिंटरचे सहायाने प्रिंट काढुन पंचानी वाचुन त्यावर सह्या केल्या. सदरचा घटनास्थळ / जप्ती पंचनामा दि. 05/03/2024 रोजी 10/10 वा. सुरु करुन 11/05 वा. संपविला. दारू पकडल्या मुळे महिलांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...