मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. पटाच्या तिस-या दिवशी 100 जोड्या धावल्या. यात अ गटात करोडी येथील मनोहर पाटील चव्हाण यांची लखन व जलवा ही जोडी पहिली ठरली. या जोडीने 6.54 सेकंदात अंतर कापत 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. तर क गटात दहिवड येथील कु. भव्या अमोल पवार यांची जलवा व सैराट ही जोडी विजेती ठरली. या जोडीने 6.79 सेकंदात अंतर कापत 41 हजारांचे रोख पारितोषिक पटकावले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला आ. प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होत्या. अखेरच्या दिवशी 40 हजार पेक्षा अधिक लोकांनी या शर्यतीचा थरार अनुभवला.
अ गटात दुसरे बक्षिस हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लक्ष्या व राणा या जोडीने, तिसरे बक्षिस धारफळ येथील अशोकराव पाटील यांच्या बजरंग व वंशी या जोडीने पटकावले. क गटात दुसरे बक्षिस वडगाव येथील नवनाथ महाराज प्रसन्न यांच्या हिरा व शिवा जोडीने तर घोंगशी कांडा येथील राम चव्हाण यांच्या बलमा व नंद्या या जोडीने तिसरे बक्षिस पटकावले. या दोन्ही गटात पहिल्या येणा-या 13 शेतक-यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले.
बक्षिस वितरण समारंभात बोलताना आ. प्रतिभा धानोरकर यांनी शंकरपट हा शेतक-यांना आनंद देणारा खेळ असून अनेक वर्षांनंतर हा खेळ सुरु झाल्याने बळीराजाच्या चेह-यावर समाधान दिसून येत असल्याचे मनोगत व्यक्त केले. तर आयोजक संजय खाडे यांनी हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानत यापुढेही कायम अशा स्पर्धा, खेळ भरवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार या शंकरपटा दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, खेळ, कला, पत्रकारिता, उद्योजक्ता, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रातील कार्यातून समाजासाठी योगदान देणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सदस्य व संजय खाडे मित्र परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...