मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
झरी:- शासनाने मागील अनेक वर्षापासून मागणी करीत असलेल्या ओबीसीच्या जातनिहाय जनगणेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहेत . त्याचबरोबर मराठा समाजाला अध्यादेश काढून सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याचा घाट घातला आहे . तरी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये व ओबिसि प्रवर्गाची बिहार प्रमाणे जातनिहाय जनगणना करावी . हया दोन प्रमुख मागण्या व इतर अठरा मागण्यांसाठी OBC ( VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीने दिनांक 11 फेब्रुवारी 2024 ला " उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी " वर " एल्गार मोर्चा पुकारून रणशिंग फुंकले आहेत . ओबीसी समाजाला सन 1990 पासून फार उशिरा शासनाने आरक्षण लागू केले आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक , नोकरीत अजूनही पूर्ण वाटा दिला जात नाही . ओबीसी साठी विविध उपाययोजना करताना केंद्र व राज्य सरकार ओबीसींची नक्की संख्या किती ही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही असे कारण सरकार वारंवार पुढे करतात . त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी , कर्मचारी व शेतकरी , शेतमजूर यांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत . या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व राज्य सरकार व केंद्र सरकार समोर समस्या मांडण्यासाठी तसेच बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यासाठी OBC ( VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी - मारेगव - झरी. जि यवतमाळ च्या वतीने " एल्गार मोर्चा " चे आयोजन दि 11 फेब्रू 2024 ला दु 12: 00 वा केलेले आहेत .
हया मोर्चात ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या सर्व जात समूहाचे बांधव सहभागी होणार आहेत . शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे सर्व ओबीसी बांधव गोळा झाल्यानंतर पुरुष व महिलांचे रॅली सदृश रांगेत मोर्चाला प्रारंभ होईल . अत्यंत शांततेत व विविध घोषणा देत मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधणार आहेत . तर मोर्चात विविध महामानव , महा नायिका यांचे कट आउट लावून तसेच विविध जयघोष देण्यात येणार आहेत. ओबीसी , व्हिजे , एन टी, एसबिसी प्रवर्गात समावेश होणाऱ्या विविध जात समूहाचे नृत्य, पेहराव , व्यावसायिक देखावे तयार करून ओबीसी बांधवांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर लेझीम पथके, बँड बाजा , डफळे , लाठी काठीचे सादरीकरण रॅली दरम्यान करण्यात येणार आहेत . संपूर्ण शहरभर फिरल्यानंतर शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे मोर्चाची सांगता होईल . त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत होईल . सभेच्या ठिकाणी मा . प्रा. डॉ लक्ष्मण यादव ( प्रसिद्ध वक्ते तथा ओबीसी विचारवंत , दिल्ली ) मार्गदर्शन करणार आहेत . साधारणता पंधरा ते वीस हजार ओबीसी प्रवर्गातील विविध जात समूहाचे समाज बांधव मोर्चात सहभागी होणार आहेत . याच मोर्चाच्या संदर्भात काल शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी मुकुतबन येथे ओबीसी बांधवांची आढावा बैठक घेण्यात आली. तरी भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी आपणही मागे न राहता " एल्गार मोर्चा " वणी येथे सहभागी व्हावे असे आवाहन OBC ( VJ,NT,SBC ) जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप बोनगिरवार , निमंत्रक मोहन हरडे , आशिष साबरे, नेताजी पारखी, अनिल टोंगे, रफीकभाई कनोजे, स्वप्नील पाइलवार,राजेश अक्केवार,नितेश भालेराव,विपीन वडके, केतन ठाकरे, आनंदराव गोहणे, संतोष देशमुख, विलास चित्तलवार, चंद्रशेखर वैद्य, रहीमखा पठाण, शशिकांत लक्षणे,नारायण गोडे,सौ ममता पारखी,रामदास पाइलवार, संदीप विच्चू,संतोष कुरमेलवार,विजय पिंपळशेंडे,मुरलीधर नाकले, तुळशीदास आवारी व OBC ( VJ,NT,SBC ) जातनिहाय जनगणना कृती समितिचे सर्व समन्वयक, सदस्य वणी - मारेगाव - झरी यांनी केलेले आहेत .
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...