सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ : दंतवैद्यक शास्त्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा 'फॅमडेंट एक्सलेंस इन डेंटिस्स्ट्री २०२४ या पुरस्काराने यवतमाळ येथील दंतवैद्यक डॉ.अमृता जानकर (शेंडगे) यांना सन्मानित करण्यात आले आहे.२० जानेवारीला मुंबईस्थित एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. दंतशास्त्रातील शैक्षणिक कामगिरी, दंतवैद्यक सेवा तसेच त्यांनी जोपासलेल्या सामाजिक दायित्वाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.जागतिक स्तरावरील या पुरस्काराने यवतमाळ शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
दंतवैद्यक म्हणून केवळ एक व्यावसायिक पेशा न सांभाळता त्यातून सामाजिक भान जपणाऱ्या दंतवैद्यकांना मागील दहा वर्षांपासून 'फॅमडेंट एक्सलेंस इन डेंटिस्स्ट्री' हा पुरस्कार देऊन गौरविले जाते.या पुरस्काराला 'ऑस्कर इन डेंटिस्ट्री' असेसुद्धा संबोधिले जाते.दंतवैद्यकाची शैक्षणिक कामगिरी,प्रॅक्टिस तसेच सामाजिक पातळीवर उत्कृष्ट कार्य पाहून दरवर्षी हा पुरस्कार जाहीर केला जातो.यंदा कुवेत,मालदीवसह अन्य आशियायी देशांतील दंतरोगतज्ज्ञांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.या सर्वांना मागे टाकत
यवतमाळ येथील डॉ. अमृता जानकर-शेंडगे यांनी या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे.२० जानेवारीला मुंबई येथील अंधेरी भागातील 'द क्लब' या हॉटेलमध्ये आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते डॉ.शेंडगे यांना पुरस्कृत करण्यात आले. डॉ. अमृता ह्या दंतवैद्यकात पदव्युत्तर तसेच लेझर सर्जरीसह थेरपीमध्ये फेलो असून मागील ६ वर्षांपासून त्या यवतमाळ येथे स्वतंत्र प्रॅक्टिस करतात.११ वर्षांपूर्वी मुंबईवरून त्या यवतमाळ येथे स्थायिक झाल्या.दंतवैद्यकाची प्रॅक्टिस करत त्या दंत व मुख रोगाशी संबंधित विविध सामाजिक उपक्रम वा जनजागृतीपर कार्यक्रमातून दंत व मुखरोगाबाबत जनजागृती व उपचार करीत आहे. हा पुरस्कार मला जरी जाहीर झाला तरी या यशात आई, वडील,पती, मुलगी, शेंडगे व जानकर कुटुंब तसेच माझे शिक्षक सहकाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे भावोद्गार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. दंत व मुखाशी संबंधित विविध आजारांबाबत लोकांमध्ये जागरुकता व्हावी तसेच या सेवा कार्यातून अन्य दंत वैद्यकांना प्रोत्साहन मिळावे,या उद्देशातून १९९९ पासून डॉ.अनिल अरोरा यांनी दंतवैद्यकातील जर्नल्स प्रकाशनाला सुरूवात केली त्यांनतर २०१३ पासून हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...