Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / धक्कादायक ! आठवीत शिकणारी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

धक्कादायक ! आठवीत शिकणारी शाळकरी मुलगी 9 आठवड्यांची गर्भवती, 23 वर्षीय युवकाकडून अत्याचार

धक्कादायक ! आठवीत शिकणारी शाळकरी मुलगी 9 आठवड्यांची गर्भवती, 23 वर्षीय युवकाकडून अत्याचार
ads images

मारेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना, सदर घटनेमुळे इतर पालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता

मारेगाव : तालुक्यातील एका शाळेत इयत्ता 8 व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या  14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर 23 वर्षीय मुलाने सतत अत्याचार केला. यात ती मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार निष्पन्न झाले.

सविस्तर वृत्त असे की,मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीला तिच्या आईने रुग्णालयात दाखल केले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 23 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. कोर्टाने सदर आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ची शिक्षा सुनावली आहे.

सविस्तर  माहितीनुसार 14 वर्षीय पीडित मुलगी ही मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असून ती शहरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तर पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी प्रणव महादेव राऊत हा तालुक्यातील केगाव (मार्डी) येथील रहिवासी आहे.

गेल्या काही एक वर्षापासून दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली. नंतर दोघांचे प्रेम संबंध जुळले. त्यानंतर नेहमीच आजोबांच्या गावाला आली की पिडितेला धमकावून 23 वर्षीय प्रणव राऊत हा अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे.  मात्र यामुळे काय घडेल त्याची कल्पना दोघांना नव्हती. त्यातच अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागले.

उपचारासाठी तिला घरच्यांनी वणी रुग्णालयात नेले असता, पीडित मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रसंग सांगितला. दरम्यान, पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी प्रणव राऊत वर अत्याचार आणि पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून याचा अधिक तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

 

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...