Home / यवतमाळ-जिल्हा / दारव्हा / दारव्हा शहरात सुसज्ज...

यवतमाळ-जिल्हा    |    दारव्हा

दारव्हा शहरात सुसज्ज आधुनिक अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण

दारव्हा शहरात सुसज्ज आधुनिक अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण
ads images
ads images

दारव्हा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी १५० कोटींचा डीपीआर , स्पर्धा परीक्षार्थीं, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात अत्याधुनिक अभ्यासिका उभारणार- पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. ७ : शहरी व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या ठिकाणी अत्याधुनिक अभ्यासिका उभारणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी  दिली.

दारव्हा शहरातील स्वामी समर्थ नगर, नातुवाडी येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्व बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्र व ग्रंथालयाचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मितकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, श्रीधर मोहोड, कालिंदा पवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रवी वाकोडे, दीपक कोठारी, मनोज सिंगी, राजू दुधे, आरिफ काझी, दामोदर लढ्ढा, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, सुभाष राठोड, सुशांत इंगोले यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, समाजामधील शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत, ही सातत्याने भूमिका राहते. लोकप्रतिनिधी म्हणून फक्त रस्ते, नाल्या, सभामंडप अशा मूलभूत सुविधांसारखे सार्वजनिक विकासकामे नेहमी करत असतो. समाजाच्या विकासासाठी नव्या संकल्पना राबविण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. या संकल्पनेतूनच दारव्हा शहरात नवे अभ्यासिका केंद्र उभे राहिले आहे. त्यात सर्व सोयीसुविधा व स्वच्छता आहे. परंतु त्या कायम राहिल्या पाहिजेत. तसेच संगणक आणि स्पर्धा परीक्षा पुस्तकांची संख्या वाढवावी लागेल.  विद्यार्थ्यांना ही अभ्यासिका उपलब्ध झाली असून अजून एक अभ्यासिका करणार आहोत. त्याच्या बांधकाम आणि इतर सुविधांसाठी १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. अशा अभ्यासिका जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या ठिकाणी झाल्या पाहिजेत या भूमिकेतून खनिज विकास निधीतून प्रत्येक शहराला १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

पैसे, साधन आणि सर्व सुविधा असलेले विद्यार्थी पुणे, नागपूर सारख्या शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जाऊ शकतात. परंतू समाजातील अनेक कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात. त्यासाठी गाव तिथे अभ्यासिका झाली पाहिजे या भूमिकेतून अभ्यासिकेसाठी गावातील शाळा, ग्रामपंचायतीत स्पर्धा परीक्षेची पुस्तके, फर्निचर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधीची भरीव तरतूद केलेली आहे. याचा पहिला टप्पा मंजूर केला असून जिल्हाभरात कामाला सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सर्व शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजे या भूमिकेतून मॉडेल स्कुलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर करून घेतला आहे. लवकरच प्रायोगिक तत्वावर काम सुरू होणार आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय, योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले.

जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देणारे प्रकल्प, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना, साखर कारखाना आणि व्ही तारा कंपनीच्या उद्योग प्रकल्पाची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

दारव्हा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी १५० कोटींचा डीपीआर

दारव्हा शहराचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याचे काम चालू आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या मार्फत दीडशे कोटींचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. दारव्हा शहरवासीयांना  पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेवर काम सुरू आहे. महिन्याभरात पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले असल्याचे सांगून दारव्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मितकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी रवी वाकोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दहावी व बारावीतील ३०८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले व पदवी, पदविका अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गुंठेवारी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
 

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

दारव्हा तील बातम्या

दारव्हा, दिग्रस नेर तालुक्यातील होतकरू युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीता शिष्यवृत्ती योजना

यवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत कमी पडू नये यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून...

जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल सरकारी शाळेचे लोकार्पण सम्पन्न

यवतमाळ : मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरातील खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या डिजिटल सुविधा मिळतात....

रागाचे भरात निघुन गेलेली अल्पवयीन तरुणी नातेवाईकाच्या ताब्यात, अहमदाबाद रेल्वे पोलीसांच्या मदतीने दारव्हा पोलीसांचे ऑपरेशन मुस्कान यशस्वी

दारव्हा: पो.स्टे. दारव्हा येथे दि. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय तरूणी रागाचे भरात निघुन...