आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग मालक, व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, या महत्वाच्या मागणीसह विविध मागण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेत शेकडो मनसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात राळेगाव तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.या सर्व मागण्यांना घेऊन मनसेच्या वतीने शासनाकडे पाठवपुरावा करण्यात येईल यावर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध असून यामध्ये राळेगाव तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कापुस, तुर लागवड केली जाते. याच कापसाच्या, तुरीच्या उत्पन्नाच्या भरवशावर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा वेचनीसाठी कापूस आला असतानाच तसेच ऐन बहार फुलांवर तुरी असतांना अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे लागवड खर्चा पेक्षा उत्पन्न कमी झाल्याने जगायचे कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असून शेतकऱ्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत तालुक्यातील काही कापूस जिनींग मालक, व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्याच तालुक्यात कापुस खेडा खरेदी सुरू असून यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना लुटून खाण्याचा धंदा जोमात सुरू आहे. त्यामुळे आपण याकडे लक्ष घालुन शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२हजार रुपये भाव, तुरीची झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, तसेच कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या जीनिंग मालक, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, खेडा खरेदी तत्काळ बंद करून असे व्यवहार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्यासह सुरज लेणगुरे, संदिप कुटे, आरीफ शेख, जिवा बुरडकर, रोशन गुरूनुले, नरेंद्र खापणे, गजु बुटे, गणेश भोयर, संदीप गुरुनुले, राहुल भोयर, गोपाल मांदाडे, अविनाश सिरासम, वामन लेणगुरे, नरेश मादाडे, आकाश पाटील, विलास मांदाडे, अखील शेख, युवराज चटकी, रामाजी डाहुले, उमेश पेंन्दोर, ओम मडावी, प्रवीण ओंकार, ऋषिकेश मिर्झापूरे, स्वप्नील भेदूरकर, सचिन आत्राम, रतन चव्हाण, सूरज खैरी, अमोल गेडाम, मनसे पदाधीकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...
*डॉ. .भिमराव.कोकरे यांना आयुष ग्लोबल अवार्ड* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड महाराष्ट्राचे पावन संत साई...