*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी १ रुपया मध्ये पंतप्रधान पिक विमा योजना सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे. पुर परिस्थिती आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे मतदारसंघांतील संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानाची विमा कंपन्यांकडून अद्यापही पाहणी आणि पंचनामेच झालेले नाही. यामुळें शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही. याच मुद्द्याला घेतं उंबरकरानी आक्रमक पावित्रा घेतं या कार्यालयाला कुलूप ठोकून हा पीक विमा लवकरात लवकर द्यावा अन्यथा यापुढें उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा सज्जड दम उंबरकर यांनी कंपनीला दिला.
मनसे नेते राजु उंबरकर आज मतदारसंघाचा दौरा करत असताना तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने असणारी पिक विम्याची समस्या जाणून घेतली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी संबंधित कंपनीकडून पंचनामेच झालेले नाही. तर जिल्ह्यात काहींच्या खात्यावर १० रुपये अशी शुल्लक रक्कम तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ही रुपया जमा झालेला नाही. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली या विषयाची तात्काळ दखल घेत उंबरकरानी शेतकऱ्यांसह मारेगाव येथील रिलायन्स पीक विमा कंपनीचे कार्यालयं गाठले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी पदवीधर किंवा याक्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहे. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी या कंपनीकडून पदवीधर व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले युवक नियुक्त केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेले नुकसानीचे गांभीर्य या प्रतिनिधींना नसल्याचे सामोरं आले. त्यामुळे कंपनीकडून योग्य ते पंचनामा आणि तसा अहवाल कंपनीकडे सादर झाला नाहीं. परिणामी काही शेतकऱ्यांना १० रुपये १०० रुपये अशी तोकडी मदत मिळाली तर सर्वाधिक शेतकऱ्यांना ही मदतच मिळाली नाही. त्यामुळे हा विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी राजु उंबरकर यांनी आक्रमक पावित्रा घेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरल. तर स्थानिक कार्यालयालातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा नसल्यानें या कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला. तर लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर यापुढें उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा सज्जड दम या अधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी मनसेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, वसंता घोटेकार, उदय खिरटकर,शेख नबी, फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, संतोष राठोड, लक्की सोमकुंवर,मयूर घाटोळे, सुरज काकडे, धिरज बगवा यांच्या सह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
- राजु उंबरकर
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...