Home / यवतमाळ-जिल्हा / पीकविमा नुकसान भरपाई...

यवतमाळ-जिल्हा

पीकविमा नुकसान भरपाई मधील तफावतीची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

पीकविमा नुकसान भरपाई मधील तफावतीची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
ads images
ads images

पीकविमा नुकसान भरपाईच्या तक्रारींसाठी प्रत्येक तालुक्यात विशेष खिडकी सुरू करण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

यवतमाळ: जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 59 हजार 404 शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाईचे 41 कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी काही शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आले आहे. काही शेतकऱ्यांना मिळालेली अत्यल्प नुकसान भरपाई ही त्या शेतकऱ्यांवर अन्याय असल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी ह्या बाबीची गंभीर दखल घेतली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पीकविमा नुकसान भरपाई रक्कम 59404 शेतकऱ्यांना मिळालेली असून त्यापैकी 9727 शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यात 78 शेतकऱ्यांना तर 10 रुपये पेक्षा कमी पीकविमा नुकसान भरपाई पीकविमा कंपन्यांनी दिली आहे त्यामुळे ह्या पीकविमा कंपन्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देऊन कार्यवाही व्हावी व ही अन्यायकारक पीकविमा मदत पुन्हा सत्य परिस्थितीचा अभ्यास करून वाढीव स्वरूपात  पीकविमा कंपन्यांनी द्यावी अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड करणार आहे. तसेच सर्वेक्षण झाल्यावर देखील पीक पिवळे पडल्याने सरासरी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष मदत शासनातर्फे करण्यात यावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.

याचबरोबर नुकसान भरपाई प्राप्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई विषयक तक्रारी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.पीकविमा नुकसान भरपाई विषक तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा कराव्या

प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त पीकविमा नुकसान भरपाई विषयक तक्रारी घेण्यासाठी विशेष खिडकी सुरू करण्याचे निर्देश जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहेत. काही शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळाला आहे, त्याबाबत चौकशी करून वाढीव मोबदला मिळवण्यासाठी व अतिवृष्टी झालेल्या भागात सरासरी उत्पन्नात घट झाल्याने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे,असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...