Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / खाद्य निगम च्या सदस्यांकडून...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

खाद्य निगम च्या सदस्यांकडून यवतमाळ जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेची पाहणी व जनजागृती कार्यक्रम

खाद्य निगम च्या सदस्यांकडून यवतमाळ जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेची पाहणी व जनजागृती कार्यक्रम

मारेगाव तालुक्यातील राशनकार्ड धारकांना निकृष्ठ दर्जाचे धान्य मिळत असल्याची गंभीर बाब उघड तसेच अंतोदय धारकांना साखरेचे वाटप न करता साखर वाटप केल्याची नोंद

यवतमाळ:खाद्य निगम च्या सदस्यांकडून यवतमाळ जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेची पाहणी व जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मा मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य  जिल्हाधिकारी यवतमाळ   यांना ई-मेल व पत्र पाठविण्यात आले.या अनुषंगाने दिनांक 04 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात भेट देण्यात आली.विषयानुसार खाद्य निगम सदस्यांच्या भेटी दरम्यान जिल्ह्यात सार्वजनिक वितरण बाबत त्रुटी, गोर गरीब लाभार्त्यांची, तसेच रास्त भाव दुकानदार यांची पिळवणूक होत असल्याचे आढळून आले.

सविस्तर वृत्त असे की, रास्त भाव दुकानदारास त्यांनी वितरण केलेल्या राशन धान्य बद्दल सहा ते आठ महिने उशिराने कमिशन चे पैसे दिल्या जातात. उद्या मारेगाव तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार यांना अजून मे पासून कमिशन चे पैसे दिलेले नाही तसेच रास्त भाव दुकानात पोहचत असलेल्या राशन धान्याची गुणवत्ता  व वजन  यामध्ये तफावत आढळून आली. गोदाम पाहणी दरम्यान गोदामपाल यांनी वजन काटे चेंज करून दुसरे काटे ठेवण्यात आले. तसेच धान्य वजन मध्ये कट्टे प्रमाणे 2 ते 3 किलो वजन कमी देत असल्याचे काही तक्रारी प्राप्त झाल्या तसेच सदस्यांसमोर वजन कमी भरत असल्याचे निदर्शनास आले.

जिल्हातील बहुतांश लाभार्त्यांना धान्य घेतल्याची पावती देण्यात येत नाही. ज्यादा दराने साखर विकली जाते. धान्य कमी प्रमाणात मागील सहा वर्षांपासून देत असल्याचे निदर्शनास आले.  करणावाडी ता मारेगाव येथील काळे याच्या दुकानात व आर्णी येथील आर एम माहुरे यांच्या दुकानात 30 रुपये ज्यादा दराने आकारले जातात. तश्या तक्रारी लाभार्थाकडून प्राप्त झाल्यामुळे रा भा दु यांची तक्रार मा तहसीलदार साहेब यांना देण्यात आली.त्यांच्या कॉपी सोबत जोडल्या गेल्याचे सांगण्यात आले.

जिल्हातील लाभार्थीना पोषण मूल्य तांदूळ वितरण होत आहे याबाबत जन जागृतीचा अभाव दिसून येत असल्याचे चित्र आहे.मारेगाव तालुक्यातील अंत्योदय लाभार्थीना साखरेचे वितरण झाले असे दाखवून लाभार्थीच्या ठसा घेऊन पावती देण्यात आलेली आहे पण प्रत्यक्षात साखरेचे वितरण झालेले नाही.किडे व अळ्या पडलेले तांदूळ व गहू लाभार्थीना वितरण होतांना रंगेहात पकडण्यात आले,  त्यानंतर मौजा करणवाडी गावात संपूर्ण दिवस दुकान चालू ठेवुन चांगला प्रतीचे धान्य वितरण करण्यात आले.

जिल्हातील सन 2017 पासून झिरो आधार असलेले लाभार्थी 2.7 लक्ष  बोगस लाभार्थीचे नावे माहे ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत डिलीट करण्यात आले. याबाबत सविस्तर कोणताही तालुक्यात चौकशी चालू असल्याचे आढळून आले नाही. उलट महिला बचत गटामार्फत मिळालेल्या दुकानात प्रत्यक्ष पुरुष मंडळी दुकान चालवीत असल्याचे निदर्शनास आले. मौजा तिवसा तालुका यवतमाळ.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राशन धान्य हे इलेक्ट्रिक वजन मापे नुसार वितरण करायला हवं असत्यांनी   जिल्हातील बहुतांश दुकान तसे दिसून आले नाही.

तसेच मा तहसीलदार साहेब कळंब, राळेगाव व मारेगाव यांना भारतीय अन्न महामंडळ समितीच्या जन जागृती कार्यक्रम व तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत होत त्रुटी बाबत निदर्शनास आणून दिले.

मा तहसीलदार साहेब, मारेगाव यांच्या कार्यालयात दोन तास चर्चा करून गोदाम पाल यांना बोलवून निदर्शनास आणून दिले की, राशन धान्याचा कट्टे मध्ये मातीचे खडे प्रत्येक गोणी मध्ये दिसून आले. फोटो सोबत जोडले आहे. तसेच मारेगाव तालुक्यातील रा भा दु संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व दुकानदार यांना कार्यालय छायाचित्र, व्हिडीओ व लाभार्थीचा तक्रारीचा कॉपी दाखविण्यात आले. तसेच मा तहसीलदार साहेब यांना सर्व दुकानदारांस तसेच समज देण्यास सांगितले.

मुंबई कडे सदस्य निघत असतांना मौजा तिवसा गावात जन जागृती करीत असतांना दुकान चालू असल्याचे व राशन धान्य कमी प्रमाणात वितरण करीत असल्याचे दिसून आले. रा भा दु यांची माहिती घेतली असता दुकान मा तहसीलदार साहेब, यवतमाळ यांनी 28 ऑगस्ट 2023 रोजी रद्द करण्याचे अहवाल वरिष्ठ कडे पाठविले तसेच आपण दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी रद्द केलेलं आहे व 05 सप्टेंबर 2023 रोजी दुकान जोडण्यात आलेलं असूनही दुकानात अनधिकृत नॉमिनी श्री. जितेश सुखदेव पवार, श्री महेश श्रावण पवार व श्री श्रावण सूर्यभान पवार वितरण करत होतो. लाभार्थीना कमी धान्य वितरनाबाबत जाब विचारले असता त्यांना मला हात धरून भाहेर काढण्याचा, घरात घेऊन जीवे मारून टाकाण्याचा हाक मुलांना दिली, जाती वाचक शिवीगाळ दिली. वरील सविस्तर तक्रार मी पोलीस स्टेशन लाडखेड तालुका दारव्हा यांच्या कडे लिखित स्वरूपात देण्यात आली. कॉपी सोबत जोडत आहे. मा उप आयुक्त पुरवठा,अमरावती विभाग यांच्या पाच सदस्य समितीचा दिनांक 01.09.2023 रोजीचा अहवाल मध्ये अनधिकृत पुरुष रा भा दु चालवीत व भ्रष्टाचार करीत असल्याचे नमूद आहे. तसेच

दिनांक 09/10/2023 रोजी वृतपत्रातील बातमी वरून खाद्य निगम च्या सदस्यांची बदनामी करण्यात आली की तोतया अधिकारी म्हणून संबंधित राशन गैर प्रकार दडपणासाठी अधिकारी वर्गाकडून केलेलं खोडसाळ पणा आहे. त्यामुळे या सदस्यांकडून मानहानी व अब्रूनुकसानसाठी नोटीस पाठविण्यात आले आहे 14 दिवसात जे कोणी सार्वजनिक ठिकाणी माफी न मागितलास कोर्टात दावा दाखल करण्यात येईल असे कळविण्यात आले.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...