Home / यवतमाळ-जिल्हा / स्काऊट-गाईड संघनायक...

यवतमाळ-जिल्हा

स्काऊट-गाईड संघनायक प्रशिक्षण शिबीर संपन्न

स्काऊट-गाईड संघनायक प्रशिक्षण शिबीर संपन्न
ads images
ads images
ads images

द भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय यवतमाळ व शिक्षण विभाग जि.प.यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन

यवतमाळ: " द भारत स्काऊटस् आणि गाईडस्" जिल्हा कार्यालय यवतमाळ व शिक्षण विभाग जि.प.यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१८ ऑक्टोबर,२०२३ रोजी श्री. हनुमान मंदिर देवस्थान ढूमणापूर ,ता.जि. यवतमाळ येथे  " एक दिवसीय स्काऊट-गाईड संघनायक प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले.                       शिबीराची सुरुवात लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आले. उद्‌घाटन उपशिक्षणाधिकारी(प्राथ.) तथा जिल्हा चिटणीस श्री.राजु मडावी यांचे शुभहस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून देवस्थानचे पुजारी श्री.राहूल पाण्डे होते.                                             प्रशिक्षणामध्ये स्काऊट-गाईड चे सिद्धान्त ,प्रार्थना ,झण्डा गीत ,नियम ,वचन ,वंदन , हस्तांदोलन पद्धती , विविध उपयोगी गाठीचे प्रात्यक्षिके , प्रथमोपाचार आदींची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्काऊट- गाईड मधील राज्य पुरस्कार , राष्ट्रपती पुरस्कार अवार्डची माहिती देण्यात आली.

Advertisement

प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा संघटक(स्काऊट)श्री. गजानन गायकवाड, जिल्हा संघटक(गाईड)श्रीमती. मनिषा तराळे , असीस्टंट लिडर ट्रेनर श्रीमती. शालीनी शिरसाठ, वरिष्ठ लिपिक श्रीमती. प्रतिमा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी तथा जिल्हा चिटणीस श्री.राजु मडावी यांनी सांगितले की-"स्काऊट-गाईड प्रशिक्षणातून सर्वांगिन विकास होतो व देशाचा जबाबदार नागरीक घडतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे फायदे मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच जिल्हा कार्यालयाच्य कार्याविषयी समाधान व्यक्त केले."

सदर प्रशिक्षण शिबीरामध्ये यवतमाळ, बाभूळगाव,नेर ,कळंब,घाटंजी,आर्णी तालुक्यातील विविध शाळांतील ५८स्काऊट ,६३ गाईड  व २४ युनिटलिडर असे १४५ सहभागींना प्रशिक्षण देण्यात आले.शिबीराच्या यशस्वीतेसाठी स्काऊटमास्टर श्री.गुणवंत गाजरे,श्री.निशांत सिडाम, गाईडकॅप्टन श्रीमती. अनिता चव्हाण, श्रीमती.हेमलता पाटील,कनिष्ठ लिपीक श्री. विद्यानंद कोमलवार ,श्री.सुरज गोईकर आणि साजिद मन्सुरी यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...