सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध जनावर तस्करी व गोमांस वाहतुक अशा अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा.पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 14/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ कडील एक पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पथकास मुखबीरव्दारे गोपनिय माहीती मिळाली की, मंगरुळपिर जि.वाशिम येथुन एका पिकअप बोलेरो वाहनांतून गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस दारव्हा, दिग्रस, पुसद, मार्ग निजामाबाद येथे घेवून जात आहे अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शहानिशा करुन कारवाई करणे करीता दोन पंचाना सोबत घेवून पुसद येथील पुस नदी जवळ सापळा लावून नाकाबंदी केली असता दिग्रस कडुन एक संशयीत पिकअप बलोरो येत असल्याचे दिसून आल्याने सदर वाहनास रोडच्या बाजूला थांबवून त्याची पंचा समक्ष पाहणी केली असता सदर वाहनामध्ये लोखंडी टाकी, त्यावर फळ विक्री व वाहतुक करीता उपयोगात येणारे कॅरेट ठेवून त्याचे खाली लोखंडी टाकी त्यामध्ये 15 ते 16 गोवंशीय बैलाचे मांस (गोमांस) मिळून आल्याने सदर वाहन चालक 1) मोहम्मद तनवीर शेख बुरहान वय 26 वर्षे, 2) मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील वय 27 वर्षे, 3) मोहम्मद जुनेद बशीर वय 27 वर्षे, सर्व रा. टेकडी पुरा अक्सा मस्जीद, जवळ कसाबपुरा मंगरुळपिर जि.वाशिम असे असून सदरचे गोवंशीय बैलाचे मांस मो इब्राहिम मो.नुर रा. टेकडी पुरा अक्सा मस्जीद, जवळ कसाबपुरा मंगरुळपिर जि.वाशिम यांच्या सांगण्यावरुन निजामाबाद येथे घेवून जात असल्याचे सांगितल्याने पिकअप बलेरो वाहन, 1470 किलो मांस (गोमांस) दोन मोबाईल असा एकूण 12,11,100 /- रु मद्देमाल जप्त करुन वरील इसमां विरुध्द पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, श्री. आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि, गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे, पोउपनि रेवन जागृत पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा पंकज पातुरकर, नापोकों कुणाल मुंडोकार, पोशि सुनिल पंडागळे, दिंगबर गिते सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...