Home / यवतमाळ-जिल्हा / दिग्रस / पोलीस स्टेशन यवतमाळ...

यवतमाळ-जिल्हा    |    दिग्रस

पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व लाडखेड हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी दारूच्या रनींग भट्टीवर छापा कारवाई करून केला 94,400/- रु चा मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व लाडखेड हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी दारूच्या रनींग भट्टीवर छापा कारवाई करून केला 94,400/- रु चा मुद्देमाल जप्त
ads images
ads images

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई

यवतमाळ : दिनांक १६/१०/२०२३ रोज सोमवार ला

पो स्टे यवतमाळ शहर व लाडखेड हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी दारुच्या रनिंग भट्टीवर छापा कारवाई करुन केला 94,400/- रु चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळने कारवाई केली.

जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत व अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा,पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेला प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

त्यावरुन दिनांक 15/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ कडील पथकाला मिळालेल्या गोपणीय माहितीचे आधारे पो.स्टे. लाडखेड हद्दीतील तिवसा शेत शिवरात हातभट्टी दारु गाळण्याचे ठिकाणी छापा कारवाई करुन आरोपी लक्ष्मण सोमाजी नैताम वय 59 वर्षे, हा दारु गाळप करत असतांना मिळुन आल्याने त्याचे कब्जातील गावठी दारु गाळण्याकरीता लागणारा मोहामाच सडवा, गावठी दारु व साहित्य असा एकुण 30,400/- रु किमंतीचा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपी विरुध्द पो.स्टे. लाडखेड येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद केला आहे. त्याच प्रमाणे आज दिनांक 16/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ कडील पथकाला गोपणीय माहिती मिळाली की, पो.स्टे. यवतमाळ शहर हद्दीतील चिमनीनाला करकडोह जंगल परिसरात इसम नामे हमीद छोटु रायलीवाले रा. गवळीपुरा तलावफैल यवतमाळ हा त्याचे नौकरांसह हातभट्टी दारु गाळत आहे. अशा माहिती वरुन छापा कारवाई केली असता आरोपी नामे हमीद छोटु रायलीवाले रा. गवळीपुरा तलावफैल हा पोलीसांची चाहुल लागल्याने घटनास्थळावरुन पळुन गेला परंतु दारु गाळप करणारे 1) रमजान छोटु उचे वय 45 वर्षे, 2) आमीन हिरा चौधरी वय 38 वर्षे सर्व रा. गवळीपुरा तलाव फैल यवतमाळ हे मिळुन आल्याने त्यांचे कब्जातुन दोन रबरी टयुब मध्ये असलेली 50 लिटर हा. भ. दारू तसेच चुलीवर ठेवुन असलेले दोन स्टील ड्रम मधील 100 लिटर मोहाचा सडवा व 32 नग ट्रॅक्टर टुयब मध्ये ठेवलेला 960 लिटर मोहामाच सडवा तसेच दारु गाळण्याचे इतर साहित्य असा एकुण 64,000 रु किमंतीचा मुद्देमाल जप्त केला असा असुन आरोपी 1) रमजान छोटु उचे वय 45 वर्षे, 2) आमीन हिरा चौधरी वय 38 वर्षे दोन्ही 3) हमीद छोटु रायलीवाले सर्व रा. गवळीपुरा तलाव फैल यवतमाळ यांचे विरुध्द पो.स्टे. यवतमाळ शहर येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, श्री. आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनि, गणेश वनारे, विवेक देशमुख, पोलीस अंमलदार, बंडु डांगे, साजीद शेख, अजय डोळे, बबलु चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, अमित झेंडेकर, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

दिग्रस तील बातम्या