Home / यवतमाळ-जिल्हा / दारव्हा / रागाचे भरात निघुन गेलेली...

यवतमाळ-जिल्हा    |    दारव्हा

रागाचे भरात निघुन गेलेली अल्पवयीन तरुणी नातेवाईकाच्या ताब्यात, अहमदाबाद रेल्वे पोलीसांच्या मदतीने दारव्हा पोलीसांचे ऑपरेशन मुस्कान यशस्वी

रागाचे भरात निघुन गेलेली अल्पवयीन तरुणी नातेवाईकाच्या ताब्यात, अहमदाबाद रेल्वे पोलीसांच्या मदतीने दारव्हा पोलीसांचे ऑपरेशन मुस्कान यशस्वी
ads images

दारव्हा: पो.स्टे. दारव्हा येथे दि. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय तरूणी रागाचे भरात निघुन गेल्याचे तीच्या पालकानी पोलीस स्टेशन दारव्हा येथे कळविले मुली कडे मोबाईल नसल्याने आम्ही तीचा आधी नातेवाईकाकडे षोध घेतो असे त्यांनी कळविल्याने नातेवाईक व पोलीस या मुलीचा शोध घेत होते. काल दिनांक एका मोबाईल क्रमांकावरून मुलीचा कॉल आल्याचे समजताच पोलीसांनी त्या मोबाईल धारकाचा नाव पत्ता व लोकेशन घेतले असता ते लोकशन गुजरात मधील मीळुन आले यष कमांकावर दारव्हा पोलीसांनी संपर्क साधुन अतिशय विश्वासात घेवुन त्या इसमास विचारपुस केली असता तो त्यावेळी रेल्वे प्रवासात अहमदाबाद गुजरात येथे जात असुन गुजरातचाच रहिवासी असल्याचे व सदर तरूणी त्या रेल्वेतुन एकटीच प्रवास करीत असुन तीच्या विनंती वरून तीला कॉल करण्यासाठी मोबाईल दिल्याचे त्याने दारव्हा पोलीसांना सांगीतले. त्यावर दारव्हा पो.स्टे. चे पोहेकॉ महेद्र भुते यांनी त्या प्रवाश्यास थोडक्यात हकीकत सांगुन अहमदाबाद पर्यत त्या तरूणीस लक्ष ठेवण्यास सांगीतले. त्या प्रवाश्याने देखील पुरेपुर मदत करून तीला चहा नास्ता दिला सदर ची रेल्वे गाडी दीड ते दोन तासात अहमदाबाद रेल्वे स्थानकावर पोहचनार असल्याने पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी तात्काळ जी.आर.पी. अहमदाबाद येथे संपर्क साधुन तेथील पोलीस निरीक्षक हरीकिशन जाट यांना हकीकत सांगुन त्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्याची विनंती केली यावर अहमदाबाद रेल्वे पोलीसांनी देखील सकारत्मक प्रतीसाद देत ती रेल्वे गाडी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर पोहचताच त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेवुन या बाबत पो.नि. विलास कुलकर्णी यांना कळविले दारव्हा ते अहमदाबाद या प्रवासास बचाच अवधी लागणार असल्याने ठाणेदार कुलकर्णी यांचे विनंती वरून अहमदाबाद येथील महीला सुधार गृहात या तरूणीची तात्पुरती मुक्कामाची व्यवस्था केली आज रोजी सदर अल्पवयीन मुलीचे नातेवाईक अहमादाबाद येथे पोहचुन व तरूणीला सोबत घेवुन परतीचे प्रवासास निघाले आहेत

दारव्हा पोलीसांच्या सतर्कते मुळे व अहमदाबाद रेल्वे पोलीसाच्या मदतीमुळे एकटींच अहमदाबाद येथे निघालेली अल्पवयीन तरूणी सुखरूप पणे पालकाच्या ताब्यात मीळाली आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री डॉ. पवन बनसोड साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पिवुष जगताप साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आदीत्य मिरखेलकर साहेब यांचे मागदर्शनात पोलस निरीक्षक विलास कुलकर्णी व पोहेकॉ महेंद्र भुते यांनी पार पाडली.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

दारव्हा तील बातम्या

दारव्हा, दिग्रस नेर तालुक्यातील होतकरू युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीता शिष्यवृत्ती योजना

यवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत कमी पडू नये यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून...

दारव्हा शहरात सुसज्ज आधुनिक अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण

यवतमाळ, दि. ७ : शहरी व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या...

जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल सरकारी शाळेचे लोकार्पण सम्पन्न

यवतमाळ : मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरातील खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या डिजिटल सुविधा मिळतात....