Home / यवतमाळ-जिल्हा / अडेगांवच्या महिला सरपंच...

यवतमाळ-जिल्हा

अडेगांवच्या महिला सरपंच अपात्र घोषित

अडेगांवच्या महिला सरपंच अपात्र घोषित
ads images
ads images

पदाचा दुरुपयोग, कर्तव्यात कसूर तथा अनियमितता केल्याचा आरोप, अतिरिक्त अप्पर आयुक्त गजेंद्र बावणे यांनी केली कार्यवाही

झरी जामणी – तालुक्यातील ग्रामपंचायत अडेगांव येथील महिला सरपंच यांचेवर पदाचा दुरुपयोग, कर्तव्यात कसूर तथा अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी अडेगावच्या विद्यमान महिला सरपंचा सिमा दतात्रय लालसरे यांना अमरावती विभागाचे अतिरिक्त अप्पर आयुक्त गजेंद्र बावणे यांनी अपात्र घोषित केले. व त्याबाबचा आदेश दिला आहे.

उपसरपंच भास्कर तुकाराम सुर, अरुण महादेव हिवरकर, दिनेश संतोष ठाकरे , निर्मलाताई दिनकर पानघाटे, सविता पुरुषोत्तम आसुटकर, माया अरुण हिवरकर, गंगा एकनाथ काटकर या सदस्यायांनी सरपंचा सिमा दतात्रय लालसरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३९ (१) अन्वये प्रकरण अप्पर आयुक्त अमरावती यांचेकडे प्रकरण दाखल केले होते. सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २९ जून २०२१ रोजी ग्रामपंचायत अडेगांव येथे मासिक सभा घेण्यात आली असून या सभेला ग्रामपंचायतमधील ११ सदस्य उपस्थित राहून हजेरी रजिस्टर ४ ते ५ व इतिवृत्त नोंदवहीमध्ये स्वाक्षऱ्या केल्या होत्या. परंतु त्यानंतर सरपंच सिमा दत्ता लालसरे यांनी केलेली स्वाक्षरी खोडून टाकली होती. सचिव ग्रामपंचायत यांनी सदर ती नोंद सुद्धा घेतलेली होती. याबाबत सरपंच यांनी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण तथा आवश्यक पुरावे प्रकरणात सादर केले नाही. त्यामुळे सरपंच सिमा लालसरे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग तथा गैरवर्तणूक केल्याचे त्यात स्पष्टपणे दिसून आले आहे. तसेच सरपंच यांनी आरसीसीपीएल मुकूटन या कंपनीकडून ग्रामपंचायत अडेगांवला कोविङ-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत दिनांक ०६ मे २०२१ रोजी प्राप्त साहित्यात व नोंदीमध्ये मोठी तफावत दिसून आली. व साहित्याची नोंद १२ दिवस उशिरा का घेण्यात आली. तोपर्यंत सदर साहित्य कोणाचे ताब्यात होते. सरपंच सिमा लालसरे यांनी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण तथा आवश्यक पुरावे प्रकरणात सादर केलेले नाही. याबाबत त्यांचे पदाचा दुरुपयोग, कर्तव्यात कसुर तथा अनियमितता केल्याचे स्पष्टपणे दिसून आले असल्याने. सर्व प्राप्त तथा उपलब्ध दस्तऐवजांचा व परिस्थितीचा विचार करत अपर आयुक्त, अमरावती यांनी सरपंचा सिमा दत्ता लालसरे यांना सरपंच तथा सदस्य पदाकरिता अपात्र घोषित केले आहे

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...