आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ:नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे बालनगरी, धनगरवाडी, मेंढला, यवतमाळ येथे शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांकरीता दि. ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त दु. ०३ ते ०६ वा. पर्यंत मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यवतमाळ येथील धम्मानंद व प्रणाली या ध्येयवेड्या युगुलाने काही महिन्यांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील धनगरवाडी ,मेंढला येथे शिक्षण व विकासापासून वंचित असलेल्या धनगर समाज व ईतर सर्व जमातीच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून व आपले एक सामाजिक कर्तव्य म्हणून बालनगरी च्या स्वरूपात मोफत शाळेची सुरुवात केली. धनगर समाज हा मेंढपाळ असल्याने आईवडील सतत भटकंती करत असतात त्यामुळे मुलांना शिक्षण घेणे शक्य होत नाही, परंतु या बालनगरी च्या स्वरूपात त्यांना शिक्षणाची संधी मिळाली.
तेव्हा आपलेही काही समाजाचे देणे म्हणुन निमा यवतमाळ चे अध्यक्ष डॉ दिनेश चांडक, राज्य उपाध्यक्ष निमा महाराष्ट्र राज्य शाखा डॉ संजय अंबाडेकर, डॉ मंगेश हातगावकर, डॉ विजय अग्रवाल, डॉ गजानन टिकनायत, महिला प्रतिनिधी डॉ कविता बोरकर, डॉ मनिषा पोहरे, डॉ विद्या पाचकवडे, डॉ डेहणकर मॅडम, डॉ आदित्य अढाऊकर ( जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ) यांनी बालनगरी येथे शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी व पालक यांची मोफत आरोग्य तपासणी करून योग्य औषधोपचार केले तसेच सुदॄढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी १८० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला व डॉ दिनेश चांडक यांनी भविष्यात आणखी शिबिराचे आयोजन करु अशी ग्वाही दिली.
विशेष म्हणजे निमा यवतमाळ चे माजी अध्यक्ष डॉ प्रविण राखुंडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बालनगरी ला ११०००/₹ रोख अशी भरघोस मदत केली. यावेळी बालनगरी चे संचालक प्रणाली व धम्मानंद यांनी सर्व निमा डॉक्टरांचे मनापासून आभार मानले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...