मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: आज गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर,2023 रोजी मारेगाव शहरात धनगरांचं पिवळं वादळ अखेर धडकलं. एकच मिशन धनगर आरक्षण, येळकोट येळकोट जय मल्हार च्या गर्जनेत धनगर समाजाने नगर पंचायत कार्यालय मारेगाव ते तहसील कार्यालय मारेगाव भव्य रॅली काढली या रॅलीत हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.महिलांची संख्या लक्षणीय होती.नंतर हा मोर्चा मारेगाव तहसील कार्यालयात च्या समोर जाऊन पोहचला आणि तिथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले. धनगर समाजाचा संविधानाच्या अनुसुचित जमातीच्या सूचीमध्ये १९५६ पासून ३६ व्या क्रमांकावर समावेश असूनही आज पर्यंत शासनकर्त्या जमातीने धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. अनेक वर्षापासून घटनादत्त न्याय हक्क मागण्यासाठी धनगर समाजआंदोलणे, मोर्चे व उपोषण करीत आला आहेत. विविध सरकारणे धनगर समाजाला आश्वस्त करून अनुसुचित जमातिच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो असे फक्त तोंडी सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नाकर्त्या सरकारने आजपर्यंत धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात केली नाही. महाराष्ट्रात धनगर समाज हा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे.समाज असंघटित
असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने धनगर समाजाचा फक्त मतदानासाठी फायदा करून घेतला. हि गोष्ट आज समाजाने गांभिर्याने घेण्याची गरज आहे. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज उपोषणे, रास्ता रोको आंदोलने, मोर्चे व धरणे आंदोलने करित आहे. एस टी आरक्षणाची अंमलबजावणी हि एवढी समाजाची रास्त मागणी असताना हे निगरगट्ठ सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करित नाही. देशात सर्व राज्यांमध्ये धनगर समाज विखुरलेला आहे. अनेक राज्यांमध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षण लागू केलेले आहेत. महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे कि, जे धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून वंचित ठेऊन राहिलं आहे. त्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकिय दृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहेत. धनगर समाजातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणात तसेच विविध स्पर्धा परीक्षेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ते फक्त आणि फक्त धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळाले नाही म्हणून. रानावनात राहणाऱ्या या गरीब समाजाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाने सर्वात जास्त फसविले आहे. त्यामुळे धनगर समाजाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आहे त्यामुळे समाजाने आज धरणे दिले.मा प्रा संजय लव्हाळे सर, आशिष साबरे सर ,अतुल बोबडे, राजकुमार बोबडे, माणिकराव पांगुळ, अरविंद वखनोर,प्रफुल झाडे, आशिष खंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मा ऍड दिलीपभाऊ एडतकर साहेब, साईनाथ बुच्चे साहेब तसेच पंडिले साहेब, शेरकी साहेब, महात्मे साहेब, उपस्थित होते.शासनाने जर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अमलबजावणी केली नाही तर धनगर समाज शासनाच्या विरोधात मतदान करून शासनाला सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही असे मत प्रमुख मार्गदर्शक एडतकर साहेब यांनी केले.यावेळी धनगर समाजाने मा तहसीलदार यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निवेदन सादर केले.कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक आशिष साबरे सर यांनी केले तर प्रास्ताविक मा विलासराव शेरकी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी मदत केली.मारेगाव, वणी आणि झरी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता.
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...
वणी:- काही दिवसा पासून वेकोली प्रशासना कडून होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे बेलोरा गावातील घरांना हादरे बसत असुन मातीचा...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...