*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव:धनगर समाजाचा संविधानाच्या अनुसुचित जमातीच्या सूचीमध्ये १९५६ पासून ३६ व्या क्रमांकावर समावेश असूनही आज पर्यंत शासनकर्त्या जमातीने धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. अनेक वर्षापासून घटनादत्त न्याय हक्क मागण्यासाठी धनगर समाजआंदोलणे, मोर्चे व उपोषण करीत आला आहेत. विविध सरकारणे धनगर समाजाला आश्वस्त करून अनुसुचित जमातिच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो असे फक्त तोंडी सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नाकर्त्या सरकारने आजपर्यंत धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात केली नाही. महाराष्ट्रात धनगर समाज हा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे.समाज असंघटित असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने धनगर समाजाचा फक्त मतदानासाठी फायदा करून घेतला.
हि गोष्ट आज समाजाने गांभिर्याने घेण्याची गरज आहे. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज उपोषणे, रास्ता रोको आंदोलने, मोर्चे व धरणे आंदोलने करित आहे. एस टी आरक्षणाची अंमलबजावणी हि एवढी समाजाची रास्त मागणी असताना हे निगरगट्ठ सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करित नाही. देशात सर्व राज्यांमध्ये धनगर समाज विखुरलेला आहे. अनेक राज्यांमध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षण लागू केलेले आहेत. महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे कि, जे धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून वंचित ठेऊन राहिलं आहे. त्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकिय दृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहेत. धनगर समाजातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणात तसेच विविध स्पर्धा परीक्षेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ते फक्त आणि फक्त धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळाले नाही म्हणून. रानावनात राहणाऱ्या या गरीब समाजाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाने सर्वात जास्त फसविले आहे. त्यामुळे धनगर समाजाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आहे. जास्तीत जास्त संख्येने समाजबांधवांनी 5 ऑक्टोबर ला मारेगाव येथील तहसील कार्यालय समोर या एक दिवसीय धरणे आंदोलनात उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाज आरक्षण कृती समिती मारेगाव च्या वतीने करण्यात आले आहे.
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...