सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
:- वणी तालुक्यातील सर्व समाज समावेशक असलेला व तालुक्याच्या आखरी टोकाला असलेल्या बेलोरा या गावात मागील काही वर्षांपासून एक गाव एक गणपती उत्सवाच्या माध्यमातून श्री.सिध्दिविनायक सार्वजनिक गणेश मंडळांनी जनतेसमोर आदर्श ठेवला आहे. तालुक्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली. मात्र, एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. अशीच एक गाव एक गणपतीची संकल्पना वणी तालुक्यातील बेलोरा गावानं गेल्या काही वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.
बेलोरा या गावातील सर्व समाजाचे महिला, पुरुष व आबालवृद्ध एकत्र येऊन सार्वजनिक गौरी पुजन, गणेशोत्सव आनंदानी साजरे करतात. संपुर्ण गाव एकाच ठिकाणी येऊन गणपती उत्सव साजरा करतात व विसर्जन मिरवणूकिला संपूर्ण गाव सहभागी होऊन कोणताही तंटा, भांडण न होता मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून गणपती बाप्पाचं विसर्जन करतात, विशेष म्हणजे या गावातील एक नागरिक एक वर्षी स्वखर्चाने गणपतीची मूर्ती मंडळाला भेट देत असून पुढील दोन वर्षांसाठी मुर्ती बुक झाली आहे. अशी परंपरा या बेलोरा गावात सुरू असून त्यामुळे हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...