आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा क्षेत्रातील युवती - युवकांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा शुभारंभ विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज मंदिर भांदेवाडा येथे नारळ फोडून करण्यात आला.
योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्याने शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असून देखील अपेक्षित क्षेत्रात अनेकांना करिअर घडवता येत नाही. यातच अनेक युवकांना बेरोजगार रहावे लागले असून अनेक युवकांच्या भविष्याचा प्रश्न आपल्यासमोर भेडसावत आहे. मनसे पक्ष नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारा भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सुशिक्षित व कुशल तरुण, तरुणींना यशस्वी करिअर करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
देशातील ५० पेक्षा अधिक आयटी, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ॲग्रिकलचर, फायनॅन्स, बीफार्मा-नसिंग, डिलिव्हरी बॉय, सिक्युरिटी गार्ड, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, सेवा क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे ५००० पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. व नोकरीत समाविष्ट करण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पक्षनेते राजू उंबरकर यांनी केले. युवकांना ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार असून आज पक्षाच्या वतीने क्यूआर कोड सुद्धा प्रसिद्ध केला आहे.
सोबतच समोरील प्रत्येक अपडेट साठी पक्षाच्या वतीने व्हाट्सअप ग्रुप ची लिंक शेअर करण्यात आली असून खाली लिंक ओपन करून तुम्ही व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकतात.
लिंक:- https://chat.whatsapp.com/LCMiZPMjAdR96l7wxbRDYf
तसेच शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय नांदेपेरा रोड वणी येथे ऑफलाइन पद्धतीने सुद्धा फॉर्म स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिकृत Google फॉर्म :-https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf5Jwy3L9mGW82RzFSy5QTdXt2edbK-P3p0RdEykDr6wSFVtw/alreadyresponded.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...