Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / पोळ्यांच्या दिवशी सापडला...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

पोळ्यांच्या दिवशी सापडला 8 फुट अजगर साप

पोळ्यांच्या दिवशी सापडला 8 फुट अजगर साप

पोळ्यांच्या दिवशी सापडला 8 फुट अजगर साप

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड

शिवाजी नगर परिसरातील रहिवाशी राजू पुडके यांच्या घराच्या आवारात असलेल्या जलतन या मध्ये मोठा साप रात्री सुमारे 11.30 ला जाताना परिसरातील लोकांना दिसला तेव्हा त्यांनी त्याची माहिती सर्पमित्र आदेश आडे ला दिली. ते त्यांचे सहकारी सर्पमित्र सोबत सिद्धांत तुल,दयानंद आडे, राजू देवकर यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले, साप मोठा असल्या कारणाने त्यांनी एम एच 29 चे तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे यांना पण बोलवून घेतले सर्पमित्रनि त्या सापाला एक तासाच्या अथक प्रयत्नाने पकडले व झोळी बंद केले व परिसरातील नागरिकांना पकडलेल्या सापा बदल माहिती दिली व भयमुक्त केले. पकडलेल्या सापाची लांबी अंदाजे आठ फुट व वजन दहा किलो असेल.

अधिक माहिती देताना सर्पमित्र, प्राणि मित्र संदीप लोहकरे असे सांगतात की पकडलेल्या हा साप भारतीय अजगर (इंडियन रॉक पायथान) असून त्याचा रंग राखाडी किंवा फिकट तपकिरी रंगावर गडद तपकिरी धबे असतात. शरीर स्थूल खवले मऊ डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या, शेपूट आखूड असते पाल्या पाचोळ्याचा ढिगारा करून मादी त्यात 20 ते 80 अंडी घालते 90 ते 100 दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. पिल्लांची लांबी साधारणतः 30 से मी  असते. त्याचे खाद्य उंदीर, घूस अश्या छोट्या प्राण्या पासून ते माकड, कोल्हा, कुत्रा असे मध्यम आकाराचे प्राणीही खाण्याची उदाहरणे आहेत. भारतात सर्वत्र जंगला पासून माळराना पर्यंत कुठेही आढळून येतो.

पकडलेल्या भारतीय अजगरला वनविभागाचे वनरक्षक आर आर लोखंडे, शुभम मेंढे व एम एच 29 चे राळेगाव तालुक्यातील      

मोहन देवकर, कारण नेहारे, गौरव खामकर, अक्षय काकडे, गणेश राखून

सूरज पवार, तेजस्विनी मेश्राम, नम्रता आगरकर यांच्या उपस्थितीत लोणी येथील निसर्गाच्या सान्निध्यात जंगल परिसरात सोडण्यात आले व राळेगाव आणि तालुक्यातील नागरिकांना सापाला ना मारता असा कुठल्याही प्रकारचा वन्यजीव आढळून आल्यास वनविभागाच्या टोल फ्री. क्रमांक 1926 किंवा राळेगाव तालुक्या साठी संस्थेच्या 95 61 905 143 या क्रमांकावर संपर्क करावा अशे आवाहन प्राणी मित्र संदीप लोहकरे यांची केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...