वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वणी :- वणी येथील सुप्रसिद्ध अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल मध्ये १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिवस व पोळा उत्सव साजरा करण्यात आला.
महान साहित्यिक व्यौहार राजेंद्र सिंह यांचा जन्मदिवस. त्यांनी हिंदी भाषेचं महत्त्व पटवून देण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. यामुळे त्यांचा जन्मदिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. हिंदी भाषेचं महत्त्व आणि ओळख पटवून देण्यासाठी तसेच हिंदी भाषेचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आज म्हणजेच 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्याने स्कूल मध्ये सकाळचा संपूर्ण परिपाठ हिंदी भाषेमध्ये घेण्यात आला तसेच हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
भारत सारख्या कृषिप्रधान देशात उत्तम शेती करण्यात बैलांचे विशेष योगदान आहे. त्यामुळे भारतात बैलांचे पूजा केली जाते. पोळा हा सण अशा दिवसांपैकी एक आहे ज्या दिवशी शेतकरी बैलांची पूजा करतात. पोळा हा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्याकडे हा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. बैल पोळ्याला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या सणाचे महत्व हा सण कसा साजरा करतात हे विद्यार्थ्यांना कळावे या स्कूल मध्ये पोळा सणाचे महत्व सांगण्यात आले तसेच नर्सरी ते वर्ग पहिलीचे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या पारंपारिक वेशात स्कूल मध्ये आले तसेच तान्हा पोळा साजरा करण्यासाठी मुलांनी आपले नंदी सजवून आणले.
दोन्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले गेले. स्कूलच्या प्राचार्या डॉ. सौजन्या मॅडम यांनी समस्त विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय हिंदी
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...