आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड राळेगाव सावंगी (पे)
येथील रहिवासी मंगेश नैताम यांच्या घरी दुर्मिळ जातीचा साप निघण्याची घटना समोर आली आहे त्यांच्या घरी दगडांच्या खाली साप जाऊन बसलेला आहे असे त्यांना दिसले असता त्यांनी एम एच 29 चे सावंगी पेरका येथील सर्पमित्र गौरव खामकर यांना फोन वरून कळविले त्यांनी वेळ वाया न जाता घटनास्थळी पोहोचून त्या सापाला इजा न होता पकडले व डब्बा बंद केले व गावातील लोकांना सापाविषयी थोडक्यात माहिती दिली व भयमुक्त केले.
एम एच 29 हेल्पिंग हँड्स ही संस्था वन्यजीव वाचवण्यास नेहमी कार्यरत असते मागील सात आठ वर्षापासून ही संस्था राळेगाव तालुक्यामध्ये काम करीत आहे.
राळेगाव तालुक्यामध्ये संस्थेचे 50 हून अधिक सदस्य कार्यरत आहे त्यात अभिजीत ससनकर, मंगेश वगैरहांडे, आदेश आडे, सिद्धांत थुल,करण नेहारे तेजस्विनी मेश्राम, शुभम एडसकर, गणेश राखुंडे, अक्षय काकडे हे नेहमी आपल्या सेवेत हजर आहे.
त्या पकडलेला सापाची माहिती संस्थेचे तालुकाध्यक्ष संदीप लोहकरे यांना देण्यात आली सापाविषयी अधिक माहिती घेतली असता प्राणीमित्र, सर्पमित्र संदीप लोहकरे सांगतात की हा साप Yellow Spotted Wolf Snake (कवड्या) पिवळा ठिपक्यांचा कवड्या प्रजातीचा दुर्मिळ साप आहे राळेगाव तालुक्यामध्ये या सापाची ही पहिलीच नोंद आहे हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो संपूर्ण काळ्या रंगाच्या शरीरावर पिवळट ठिपक्यांच्या आडवे पट्टे असतात पोटाकडील भागावर पांढरे ठिपके डोळे काळे व डोक्याचा रंगही काळा असल्याने लवकर दिसत नाही या सापाची लांबी सरासरी एक फूट अधिकतम दीड फूट एवढी असते मादी जून जुलै महिन्यात एक ते चार अंडी घालते या सापाचे खाद्य जंगली पाली सरडे व काही वेळेस कीटक शहर व ग्रामीण भागातही आढळतो व पालीच्या शोधात घराजवळ येतो हा साप निशाचर शांत लाजाळू कवड्या सापाच्या तुलनेत याची संख्या खूपच कमी असल्याने क्वचितच प्रसंगी दिसतो.
साप अन्नसाखळीतील मुख्य घटक आहे त्यांना जीवनदान देणे हे आपलं कर्तव्य आहे लोकांनी सापाला न मारता स्वतःचा आणि सापाचा जीव धोक्यात घालू नये कुठलाही साप किंवा वन्यजीव धोक्यात किंवा आपल्या परिसरात आढळून आल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 ला किंवा एम एच 29 च्या राळेगाव तालुक्यासाठी 95 61 905 143 या क्रमांकाला संपर्क करणे असे आवाहन प्राणीमित्र सर्पमित्र संदीप लोहकरे यांनी जनतेला केले आहे
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...