Home / यवतमाळ-जिल्हा / स्वांतंत्र्य दिनी रक्तदान...

यवतमाळ-जिल्हा

स्वांतंत्र्य दिनी रक्तदान शिबीर व डॉ.गवार्लेज पाईल्स किट चे उद्घाटन संपन्न

स्वांतंत्र्य दिनी रक्तदान शिबीर व डॉ.गवार्लेज पाईल्स किट चे उद्घाटन संपन्न
ads images
ads images
ads images

मुळव्याध, भगंदर, फिशर इ. गुदभागाच्या विकारासाठी तयार केलेली आयुर्वेदिक औषधीची "पाईल्स किट' चे उद्घाटन,शिबिरात ८२ रक्तदात्यांनी रक्तदान केले

यवतमाळ: १५ ऑगस्ट,2023 रोजी शासकीय रक्तपेढी, शैलेश करिहर मित्र परिवार, गवार्ले पाईल्स हॉस्पीटल व यवतमाळ येथील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शिवशक्ती लॉन्स येथे रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात गवार्ले हॉस्पीटल कडुन मोफत रक्ताची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.गवार्ले हॉस्पीटलच्या संचालिका डॉ.अंजली गवार्ले यांनी मुळव्याध, भगंदर, फिशर इ. गुदभागाच्या विकारासाठी तयार केलेली आयुर्वेदिक औषधीची "पाईल्स किट'' चे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले.हे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री.योगेश देशमुख तसेच डॉ.संजय रत्नपारखी, अध्यक्ष (आय.एम.ए.), डॉ.दिनेश चांडक, अध्यक्ष (एन.आय.एम.ए.), डॉ.सुमित छत्ताणी, अध्यक्ष (आय.डी.ए.), श्री.संजय आत्राम (क्राईम ब्राँच), श्रीमती शैलाताई मिर्झापुरे, सौ.किर्ती राऊत, श्री.शैलेश करीहर, श्रीमती उषाताई दिवटे, श्री.विजय बुंदेला तसेच सर्व सामाजिक संस्थांच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.पी.एस.चव्हाण सर यांनी या "पाईल्स किटच्या'' उद्घाटनासाठी शुभेच्छा दिल्या.डॉ.अंजली गवार्ले ह्या यवतमाळच्या सुप्रसिध्द मुळव्याध भगंदर तज्ञ आहेत व वैद्यकिय क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. आयुर्वेदीय क्षारसुत्र चिकित्सेकरीता त्यांचे इंडीया बुक ऑफ रेकॉर्डला नामांकन झाले आहे. तरी मुळव्याध, भगंदर, फिशर इ. आजारासाठी गर्भिणी स्त्रीया तसेच लहान मुलांमध्ये होणाऱ्या गुदभागातील विकारासांठी हि आयुर्वेदिक औषधीची किट गवार्ले हॉस्पीटल अंजनेय सोसायटी, यवतमाळ येथे उपलब्ध आहे. डॉक्टर अंजली गवारले यानी शिबिरात रक्तदान व आरोग्या विषयी मार्गदर्शन केले,तसेच औषधी , किटचे वितरण केले .

डॉ.मनोज बरलोटा, डॉ.ज्ञानेश्वर पुनसे, डॉ.विनोद दुद्दलवार, डॉ.आनंद बोरा, डॉ.शैलेश यादव, डॉ.सुमित शेंडे, डॉ.प्रविण राखुंडे, डॉ.मनिष सदावर्ते, डॉ.संजय अंबाडेकर, डॉ.मंगेश हातगावकर, डॉ.आदित्य अढाऊकर, सौ.विद्याताई खडसे (जिजाऊ ब्रिगेड), सौ.प्रतिभा खसाळे महिला पतंजली, सौ.साक्षी उत्तरवार, सौ.किशोरी उपलेंचवार, सौ.प्रतिभा पवार, सौ.वर्षा चौधरी, सौ.प्रविणा ढोले, सौ.अबोली डिक्कर, सौ.अमृता येरावार, सौ.भावनाताई लेडे, सौ.वर्षा पडवे, सौ.सुनिता भितकर, सौ.पुनम जयपुरीया, सौ.निलीमा मंत्री, सौ.वर्षा मोकाशे, कु.स्नेहल चव्हाण, सौ.माधुरी भोयर इत्यादी पाईल्स किटच्या उद्घाटन  प्रसंगी उपस्थित होत्या.

तसेच नॅशनल इंटिग्रेटेड  मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल व डेंटल  असोसिएशन,  होमिओपथिक असो, मास्क क्रिएटिव्ह क्लब, जिजाऊब्रिगेड, महिला पतंजली, अर्यवैष्या, मॉम क्लब,मंडळ,महाराणी येसूबाई, इंनिव्हील क्लब , लीनेस , वसुंधरा,फाउंडेशन उदान मंच, इंनरव्हील ज्वेल , नारीरक्षा, सेवा, प्रज्वल,संकल्प, इत्यादी अनेक सामाजिक  संस्थांच्या सहभाग होता, तसेच अ. भा.मारवाडी महीला साघटना ने नेत्रदान अवयवदान मोहिमेंतर्गत येथे जनजागृती व नोंदणी केली. तसेच बाळ सज्जांनवार, सतिश राठोड,रवींद्र ढगे, प्रशांत  घोडे, संजय मंत्री यानी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. सूत्रसंचलन स्वाती सहत्रबुधे यांनी केले, शिबिरात ८२  रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...