आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून २० ऑगस्ट रोजी वणी येथील बाजोरिया हॉल येथे बिरसा ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम तीन सत्रात विभागला आहे. प्रथम सत्राच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.संचिता नगराळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रमेश कुळमेथे हे उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून, माजी आमदार विश्र्वास नांदेकर, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष इजहार शेख, विजय नगराळे, निळकंठ जुमनाके, देविदास चांदेकर, डॉ.गजानन मेश्राम, आनंदराव आत्राम, सुभाष आत्राम, दिलीप भोयर,अजय धोबे, मंगल तेलंग,नईम अजीज,संबा वाघमारे,राजू तुरानकर,प्रविण खानझोडे, राहुल आत्राम, कैलास आत्राम, हरीभाऊ रामपुरे, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड.एल.के.मडावी, हे समान कायदा आदिवासी समाजाला पोषक की नुकसान देह,या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.तर डॉ.अभिशाला बेहरे,( गावतुरे) हत्या आदिवासी समाजातील महीलांचा सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक व राजकिय सर्वत्र वाढीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात दहावी, बारावी, पदवीधर, विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.तसेच समाजहितासाठी अहो रात्र झटणाऱ्या व्यक्तिचा बिरसा ब्रिगडच्या वतीने समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यात सत्कार मूर्ती म्हणुन प्रा.वसंत कनाके, आदिवासी साहित्यिक यवतमाळ,ब्राहाणनंद मडावी, कवी साहित्यिक मुल, चंद्रपूर, तसेच विनोदकुमार आदे, कवी,साहित्यीक,तथा संपादक वणी यांचा समावेश आहे.
अंतिम सत्रात आदिवासी समाजातील सांस्कृतीक वारसा टिकून राहण्यासाठी आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात गोंडी नृत्य,व ढेमसा नृत्य सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला बिरसा ब्रिगेड चे महाराष्ट्र राज्य व विदर्भातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.तरी वणी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बिरसा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष सुधाकर चांदेकर यांनी केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...