Home / यवतमाळ-जिल्हा / वणी येथे वक्तृत्व स्पर्धा...

यवतमाळ-जिल्हा

वणी येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

वणी येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न
ads images
ads images
ads images

शालेय गटाकरिता "भारतीय स्वातंत्र्यानंतरची शेतकऱ्यांची स्थिती " तर खुल्या गटाकरिता "भारतीय लोकशाही समोरील आव्हाने" विषयांवर पार पडली स्पर्धा

वणी: येथील ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या जन्मदिवसाचे व भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, वणी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शाखा-वणी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा-वणी, खंडोबा-वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, वणी, ओबीसी महिला समन्वय समिती, वणी आणि ओबीसी (व्हीजे/एनटी/एसबीसी) जातीनिहाय जनगणना कृती समिती, वणी- झरी-मारेगाव, जिल्हा-यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ""वत्कृत्व स्पर्धा""दि. १६ ऑगस्ट २०२३ रोज बुधवारला "खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृह, वणी येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा " *शालेय गट" व "खुला गट" अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण ७१ स्पर्धक सहभागी झाले होते. शालेय गटाकरिता "भारतीय स्वातंत्र्यानंतरची शेतकऱ्यांची स्थिती " तर खुल्या गटाकरिता "भारतीय लोकशाही समोरील आव्हाने" असे विषय ठेवण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून स्पर्धक सहभागी झाले व दमदार अशा वत्कृत्वाची मेजवानी वणीकर जनतेला उपलब्ध झाली. शालेय गटातून प्रथम क्रमांक तेजस्विनी गव्हाणे (वणी), द्वितीय क्रमांक अंशुल गोडे, (कोसारा), तृतीय क्रमांक क्रितेश पाल (नेरड) , प्रोत्साहनपर तन्वी धांडे (भेंडाळा ), अमृत चव्हाण( वणी) आणि खुशी सहारे (वणी ) तसेच खुल्या गटातून प्रथम क्रमांक प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपूर) ,द्वितीय क्रमांक श्रृती मोहितकर (राजुरा) ,तृतीय क्रमांक निलेश भोस्कर (वणी) तर प्रोत्साहनपर आचल किन्हेकर (कोठोडा),जयशील कांबळे (महागाव ) यांनी पटकावल्या बद्दल त्यांना रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षिस वितरण सोहळ्याकरिता अध्यक्ष म्हणून अशोकराव चौधरी तर प्रमुख पाहुणे  म्हणून अनिल आक्केवार, वसंत गोरे, राम महाकुलकर, प्रभाकर मोहितकर, नारायण मांडवकर, धनराज भोंगळे, किशोर बोढे, निलिमा काळे, शंकर उरकुडे आणि रवि चांदणे हे उपस्थित होते.तर परीक्षक म्हणून प्रा.बाळकृष्ण राजूरकर, नामदेवराव जेनेकर,रविंद्र आंबटकर व गजानन चंदावार यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाप्रसंगी ओबीसी जातनिहाय जनगणनेकरिता झटणारे आणि तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी पार पाडणारे जेष्ठ कार्यकर्ते "श्यामराव घुमे आणि पांडुरंग पंडिले" यांना ओबीसी समाजभूषण सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या वत्कृत्व स्पर्धेकरिता मेहनत घेणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ कांडारकर, सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे व नितीन मोवाडे तर आभार प्रदर्शन विलास शेरकी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक लोकांचे सहकार्य लाभले.

Advertisement

 

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...